31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र2024 नंतर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात; आतापर्यंत काँग्रेसमधील चौकडीमुळे त्यांचे नाव...

2024 नंतर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात; आतापर्यंत काँग्रेसमधील चौकडीमुळे त्यांचे नाव मागे पडले : यशवंतराव गडाख

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनई (जि. अहमदनगर) येथे त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठाकरेंचे कौतुक करतानाच शरद पवार यांच्याबाबत देखील त्यांनी गौरवोद्गार काढले. 2024 नंतर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असे देखील गडाख यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयात लागला. त्यानंतर माध्यमांमध्ये क्रिया-प्रतिक्रीयांचांचा महापूर वाहत असताना ठाकरे आज अडचणीच्या काळात एकनिष्ठ राहणाऱ्या शकंरराव गडाख यांच्यामुळे ठाकरे यांनी त्यांचे पिता यशवंतराव गडाख यांच्यावाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी यशवंतराव गडाख यांनी माध्यमांशी मोकळ्या मनाने संवाद साधत अनेक गोष्टी सांगितल्या. ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शंकरराव गडाख यांना मंत्रिपद दिले. बाळासाहेब ठाकरेंशी देखील आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तेच उद्धव यांच्यासोबत देखील राहिल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या फुटीच्यावेळी देखील ठाकरेंसोबतच रहायचे असे शंकरराव गडाख यांना सांगितले होते असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांचे तोंड भरुन कौतुक केले. यशवंत राव गडाख हे पवारांचे जूने शिलेदार त्यामुळे यशवंतराव यांनी पवारांबद्दल अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. शरद पवार यांना मागेच पंतप्रधान होता आले असते मात्र काँग्रेसमधील चौकडीमुळे त्यांना आतापर्यंत ते पद मिळाले नाही. त्या चौकडीमुळे पवारांविरोधात दिल्लीत नेहमी कान भरले जायचे. मात्र असे असून देखील आम्ही पवारांच्या कायम पाठीशी राहिलो असे यशवंत राव गडाख यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांच्या गोपनीय दौऱ्याची चर्चा; सत्तासंघर्षाच्या निकालावर “नो कॉमेंट्स”

“निर्लज्जासारखं हसताय…जनता धडा शिकवेल; सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

गोगावलेंचे प्रतोदपद बेकायदा ठरवल्याने ठाकरेंच्या आमदारांना बळ  

यशवंतराव गडाख म्हणाले, शरद पवार यांची कारकिर्द संघर्षमय आहे, वयाची 80 वर्षे उटलून देखील ते कार्यरत आहेत. देशाच्या राजकारणात देखील त्यांचे आजही वजन आहे. या परिस्थितीचा विचार केरता परिस्थिती बदलल्यास 2024 नंतर शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी