30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रSharad Pawar : मोदींच्या 'अच्छे दिन'वरून शरद पवार झाले आक्रमक

Sharad Pawar : मोदींच्या ‘अच्छे दिन’वरून शरद पवार झाले आक्रमक

भाजप केवळ संभ्रम निर्माण करीत असून दिलेली आश्वासने अजिबातच पाळताना दिसत नसल्याचा आरोपच पवार यांनी यावेळी केला असून अच्छे दिनची घोषणा करून सुद्धा लोकांना अच्छे दिन कधीच पाहायला मिळाले नसल्याचे सुद्धा पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारवर हल्ला चढवत त्यांच्याच ‘अच्छे दिन’च्या संकल्पनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. लोकांमध्ये भाजप केवळ संभ्रम निर्माण करीत असून दिलेली आश्वासने अजिबातच पाळताना दिसत नसल्याचा आरोपच पवार यांनी यावेळी केला असून अच्छे दिनची घोषणा करून सुद्धा लोकांना अच्छे दिन कधीच पाहायला मिळाले नसल्याचे सुद्धा पवार यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यातील सत्तांतर आणि जनतेची फरफट यावर शरद पवारांनी आज भाष्य केले.

माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण या जिल्ह्यात आमदार जास्त आहेत. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आणि राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत ते एकाच विचारांचे आहेत. या सरकारकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत मात्र ती पूर्ण केली जातायत का हा देखील सवाल आहे. 2014 साली यांनी अच्छे दिनची घोषणा केली होती. त्याचं पुढं काही झालं नाही. पुन्हा 2019 साली यांनी ‘न्यू इंडिया’ अशी घोषणा केली ती पूर्ण झालेली नाही. आता 2024 साला साठी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशी घोषणा देण्यात येतेय. त्याची पूर्तता होतेय का हे पाहणं महत्त्वाचे आहे, असे म्हणून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा…

Sharad Pawar : ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज, शरद पवारांचा सूचक इशारा

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह थेट पोहोचला पोलिस स्टेशनमध्ये

VIDEO : ‘फेटेवाले बाप्पा’

महिलांच्या असुरक्षिततेविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे असं सांगत शरद पवार म्हणाले की, गुजरात मध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामधे सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी कठोर शिक्षा दिली. आजन्म कारावास देण्यात आला. त्यानंतर ती जन्मठेपेत वर्ग केली आणि आता गुजरात सरकारने त्यांना सोडलं आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मोदी यांचं 15 ऑगस्टच भाषण ऐकलं, त्यामधे स्त्री वर्गाबाबत ते बोलले, मात्र त्यांच्यांच राज्यांत एका महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना सोडण्यात आले आहे, असे म्हणून त्यांनी केवळ बाता करणाऱ्या सरकारविरोधात नाराजी प्रकट केली.

दरम्यान राज्यातील संपुर्ण परिस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणतात, मी ठाण्यात बैठकीसाठी आलो होतो. माझा प्रयत्न असा राहणार आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या – जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्याची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे, असे म्हणून पवार यांनी राजकारणातील रणशिंग नव्याने फुंकले आहे त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा सगळ्यांना अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी