30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; नागालँडमध्ये भाजपला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; नागालँडमध्ये भाजपला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

नागालॅँडमध्ये भाजप आणि नेशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी (NDPP) यांनी विधान सभेच्या ६० जागांपैकी ३२ जिंकत सरकार स्थापन केले आहे एनडीपीपीचे एन. रिओ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून या सरकारला आता नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील पाठींबा दिला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागालँडमध्ये आमचा भाजपला पाठिंबा नसून एनडीपीपीचे मुख्यमंत्री एन. रिओ यांना आमचा पाठिंबा असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar said that in Nagaland, he supports Chief Minister N Rio and not BJP)

नागालँड विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एनडीपीपीने २५ जागा, भाजपने १२ जागा जिंकल्या आहेत. तर ७ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेथे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नुकताच नागालॅँड सरकारचा शपथविधी सोहळा देखील पार पडला असून मुख्यमंत्रीपदी एन. रिओ यांनी शपथ घेतली आहे. नागलॅँडमध्ये एनडीपीपी-भाजपचे स्पष्ट बहूमतातील सरकार आहे. त्यांना कोणत्याही इतर पक्षाची तेथे गरज नाही. मात्र तरी देखील राष्ट्रवादी तसेच एक जागा जिंकलेल्या जेडीयुने देखील सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा
नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

संसदेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत संसदीय दुभाषी पदासाठी १३ जागांची भरती

सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

शरद पवार यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली, पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटते की, मेघालय आणि शेजारच्या राज्यात निवडणूका झाल्या त्यावेळी निवडणूक प्रचाराला पंतप्रधान आणि गृहमंत्री आले. पंतप्रधानांनी प्रचारादरम्यान तिथले मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याची टीका करत त्यांचा पराभव करा असे प्रचारात सांगितले होते. मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याच सोबत ते सत्तेत सहभागी देखील झाले, आम्ही अशी कोणती भूमिका घेतली नसल्याचे पवार यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी