34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

टीम लय भारी

सांगोला : गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर शरद पवारांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबातील लोकांची सांत्वनपर चौकशी केली. (Sharad pawar visiting sangola to convey condolences to deshmukh family)

मंत्रिपदाचा लोभ न धरता सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे गणपतराव देशमुख शेतीतील पाण्याच्या प्रश्नांविषयी आग्रही होते. त्यांचे नेतृत्व फक्त संगोल्यापूरते मर्यादित नव्हते तर त्यांची व्याप्ती संपुर्ण महाराष्ट्रात पसरली होती.

महादेव जानकर दिल्लीच्या वाटेवर, डॉ. महात्मेंच्या जागेवर वर्णी लागणार

Sharad pawar
शरद पवार

धनंजय मुंडेंची लोकप्रियता शिगेला, मातब्बर नेत्यांच्या पंक्तीत समावेश, पंकजा मुंडेंनाही टाकले मागे

55 वर्षे विधानसभा आमदार म्हणून कर्तृत्व गाजवल्यानंतर 30 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. राजकीय कामांमुळे शरद पवार (Sharad pawar) यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकले नव्हते. म्हणून रविवारी 8 ऑगस्ट दिवशी त्यांनी गणपतराव देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली.

पवारांच्या (Sharad pawar)या भेटीच्या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, नानासाहेब लिगडे, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, धनंजय मुन्ना महाडिक, बळीराम साठे, शिवाजीराव काळूनगे, बाबासाहेब काटकर व देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

पोलिसांकडून झाली चूक, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

Sharad pavar
गणपतराव देशमुख

Longest serving MLA from Maharashtra Ganpatrao Deshmukh passes away

शेतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या गणपतरावांसाठी त्यांच्या नावाने गावातील व इतर शेतकऱ्यांसाठी असल्या काही योजनांना त्यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी