27 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रशरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस

शरद पवार आमदार जयकुमार गोरे यांच्या भेटीला; रुग्णालयात जावून केली तब्बेतीची विचारपूस

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची पुण्यातील रूबी ह़ॉल रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. आमदार जयकुमार गोरे हे अपघातात जखमी झाले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्बेत देखील स्थिर आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार रुग्णालयात येऊन भेटल्याचा फोटो पोस्ट करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यातील रुबी ह़ॉल रुग्णालयात (Ruby Hall Hospital) आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली असे म्हटले आहे.


पुण्याहून आपल्या गावी जात असताना शनिवारी रात्री आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण जवळ अपघात झाला होता. या अपघातात त्यांचे वाहन जवळपास तीस फुट खोल बाणगंगा नदीच्या पात्रात कोसळले होते. यावेळी आमदार गोरे, त्यांचे पीए, चालक आणि सुरक्षेसाठी असलेले एक पोलीस कर्मचारी असे चौघे जखमी झाले होते. या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना अधिक उपचारासाठी पुण्यातील रूबी ह़ॉल रुग्णालयात दाखल केले आहे.

हे सुद्धा वाचा


खासदार गिरीश बापट यांची शरद पवारांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

VIDEO : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात

सीमाप्रश्नासंदर्भातील ठरावात ‘या’ शहरांचा उल्लेख आवश्यक; अजित पवारांच्या मागणीनंतर दुरुस्ती

जयकुमार गोरे यांच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार महेश काळे, आमदार कुणाल पाटील, सिद्धार्थ शितोळे, राजेंद्र पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची विचारपूस केली. आज शरद पवार यांनी देखील आमदार गोरे यांची रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. काल (दि. २६) रोजी शरद पवार यांनी भाजपचे खासदार गिरीष बापट यांची दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेतली होती.

 

 

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!