25 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमहाराष्ट्रBharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार...

Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

शरद पवार हे तब्येतीच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत सुरु झालेली राहुल गांधींच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रासोमवारी रात्री नांदेडमध्ये दाखल झाली. महाराष्ट्रात पाऊल ठेवताच राहुल गांधी यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी धगधगती मशाल हाती घेऊन भारत जोडो पद यात्रा सुरु केली. पुढील 18 दिवस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रा 328 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अनेक संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान, या भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती दिली. शरद पवार यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आठ दिवस शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची तब्येत बरी नसल्याकारणाने शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु शरद पवार हे तब्येतीच्या कारणास्तव भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नसले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे आणि रोहित पवार हे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. पुढील 18 दिवसांत राष्ट्रवादीचे हे नेते वेगवेगळ्या ठिकाणाहून या यात्रेत सहभागी होतील

भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे तसेच इतर नेते सहभागी झाले. तर बुधवारी (ता. 9 ऑक्टोबर) भाई जगताप, अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे यांच्यासह इतर नेते सहभागी झालेले पाहायला मिळाले.

हे सुद्धा वाचा

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

Justice DY Chandrachud : सुप्रीम कोर्टाची कमान मराठी माणसाच्या हातात

भारत जोडो यात्रेमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या आहेत. यात्रेमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी राहुल गांधी हे यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांशी संवाद सुद्धा साधत आहेत. बुधवारी राहुल गांधी यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून या यात्रेबाबत अनेकांकडून टीका करण्यात आली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!