27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रराज्यपालांच्या भूमीकेवर शरद पवारांची बोचरी टीका

राज्यपालांच्या भूमीकेवर शरद पवारांची बोचरी टीका

टीम लय भारी

मुंबई : आमच्या हातात सत्ता आहे. आम्ही बोलू ती पूर्वदिशा, टोकाची भूमिका घेतली जात आहे. सत्तेचा गैरवापर करून एकप्रकारे दमदाटीचे वातावरण तयार करीत असल्याचे दिसत आहे. त्यांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय सद्यपरिस्थितीवर ताशेरे ओढले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज धुळे येथे राष्ट्रवादी भवनाच्या नूतन वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

 लोकांशी संवाद साधावा. कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या पाहिजे. हे पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. मागील दोन आठवड्यात राज्यामध्ये अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, अतिवृष्टीने नुकसान केलं आहे. अजित पवार हे गेल्या तीन दिवसांपासून नुकसान ग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. हाच दृष्टीकोन पक्षाचा असला पाहिजे, संकट आल्यानंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कधीही मागे जात नसतो. इथल्या पक्षाची वास्तु अडचणीत होती. ती आज उत्तम स्थितीत झाली आहे. त्यामुळे मला आंनद झाल्याचे ते म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, सत्तेचे काही जोश असतात. सत्तेचे काही नियम असतात. मात्र सध्या याउलट होत आहे. भाजपवर टीका करताना म्हणाले, तुमच्याकडे बहुमत आहे. राष्ट्रपतीचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केलेल्या अधीररंजन चौधरींनी माफीही मागितली. मात्र त्यानंतर सोनिया गांधींवर हल्लाबोल करण्यात आला. सोनिया गांधी फक्त विचारण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर सर्वच भाजप नेत्यांनी हल्ला केला. सदनामध्ये भीषण दृश्य बघायला मिळाले.

विधानसभा अध्यक्षांसाठी राज्यपालांनी दोन वर्षे पाठवलेल्या प्रस्तावावर सही केली नाही. आता नवे सरकार आले. त्यापूर्वीच नवा अध्यक्ष देखील आला. अशा प्रकारे सत्तेचा गैर वापर सुरु आहे. राज्यपाल अशी दुटप्पी भूमीका घेत असतील तर जनतेने लोकशाहीवर विश्वास कसा ठेवावा. एका वेगळ्या रस्त्याने देश चालविला जात आहे. आता तुमची माझी सगळ्याची जबाबदारी आहे. काय पडेल ती किंमत उभी करू मात्र लोकशाहीचे जतन करू,असे बोलून शरद पवारांनी खानदेशमधील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

हे सुध्दा वाचा:

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

राज्यपालांना कोल्हापूरचा जोडा दाखविण्याची गरज : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!