30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे,...

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार‍ (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये केंद्र आणि राज्याच्या अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार‍ (Sharad Pawar) आणि जितेंद्र आव्हाड यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये केंद्र आणि राज्याच्या अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्यात झाला असता तर आनंद झाला असता. परंतु तो प्रकल्प देशात होत असल्यामुळे मी विरोध करणार नाही. सगळयांनी गुंतवणुकीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे सगळयांचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याचा व‍िचार करण्याची गरज आहे. दसरा मेळाव्या विषयी बोलतांना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कला हजर राहिले असतील. त्यामुळे त्यांनी हा वाद वाढवून घेऊ नये.

शिंदेगट बीकेसीमध्ये दसरा मेळावा घेणार आहे. जर पहिल्यांदा शिवाजी पार्कची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली असेल, तर ते त्यांना मिळावे. करोना काळात सणांवर महाविकास आघाडीने बंदी आणली असा आरोप भाजप आणि शिंदेगट वारंवार करत आहेत. यावर शरद पवार यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले आहे. देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थाली वाजवण्यापासून अनेक गोष्टी केल्या. देशात करोना महामारीमुळे लॉकडाऊन केला. लॉकडाऊची घोषण ही पंतप्रधान नरेंद्र मोंदींनीच केली होती. त्यामुळे सण, उत्सव, सभा संमेलने बंद होती. तेच धोरण महाव‍िकास आघाडीच्या काळात महाराष्ट्राने देखील पाळले. मोदींनी घेतलेला तो निर्णय योग्य होता असे सष्टीकरण शरद पवार यांनी यावेळी द‍िले. कुठल्याही राजकीय पक्षाला पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यवाही करण्याचा अध‍िकार आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : माझी लवकरात लवकर चौकशी करा, शरद पवारांचे राज्य सरकारला खुले आव्हान

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

Actress Samantha Ruth Prabhu : अभ‍िनेत्री सामंथा रुथ प्रभु घेतेय परदेशात उपचार

निर्मला सितारमण बारामतीला येत आहेत. त्याची चिंता करण्याचे कारण नाही. त्या देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो. बारामतीच्या खासदारांनी त्यांचे स्वागत केले आहे. या पूर्वी पंतप्रधान, राष्ट्रपती अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच अमित शहा देखील येऊन गेले आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही. उद्याच्या निवडणुकांची त्यांना काळजी वाटत असेल. चिंता वाटत असेल म्हणून ते भेटी देत आहेत. उत्तर तसेच दक्ष‍िण‍ भारतात अनेक ठिकाणी त्यांचे सरकार नाही. ‍महाराष्ट्राप्रमाणे काही ठिकाणी त्यांनी सत्ता ओरबाडून घेतली आहे. उत्तर भारत भाजपसाठी अनुकूल नाही, म्हणून ते हे धोरण स्विकारत आहेत.

राहूल गांधीनी घेतलेल्या उपक्रमाचा त्यांना राजकीय फायदा होईल. आम्हाला देखील या आशा यात्रांचा फायदा झाला पूर्वी झाला होता असेही शरद पवार यांनी राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेसंबंधी बोलतांना सांगितले. रामदास कदम यांच्या विषयी प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ज्यांच्या बद्दल मी बोलावे त्यांची नावे तर बघा ! मी व्यक्तीगत बोलत नसतो. मनसेच्या वतीने आरोप केले आहेत यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हाताच्या बोटावर मोजता येणार नाही इतके लोक विध‍िमंडळात आणता येत नाहीत. त्यांच्या बद्दल काय बोलावे ! मी लोकांचे प्रश्न काय आहेत त्यावर लक्ष देतो. प्राणी वगैरे यांसंबंधी मी बोलत नाही.

राज्यात पाऊस पडत आहेत. प‍िके नष्ट होत आहेत. राज्य सरकारने मदत पोहोचवण्याचे आश्वासन द‍िले आहे परंतु मदत पोहोचलेली नाही. घोषणा केली की, राज्याचा प्रमुख बोलतो त्यावेळी लोकांच्या अपेक्षा असतात. जे धोरण जाहिर केले त्याची अंमलबजावणी करावी असा सल्ला देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. आगामी निवडणुकांसाठी विरोधकांची एकजूट झाली तर चांगले आहे. देशातले चित्र भाजपला अनुकूल नाही. 50 वर्षे या देशाला चिंता नाही अशा घोषणा ते करतात. या घोषणा कोण लिहून देतो. मुख्यमंत्री त्या वाचतात. राज्य प्रमुखांनी स्वत: निर्णय घ्यावा लागतो. बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर जास्त लक्ष हवे. उदा पालकमंत्री नेमणे वगैर इतर कामांचा निपटारा मुख्यमंत्री यांनी करावा असे शरद पवार यांनी यावेळी सुचवले.

योगी सरकारच्या मदारश्यांच्या सर्वेक्षणावरून देखील त्यांनी कानमंत्र दिला. की. कोणत्याही धर्मात दुही पसरवण्याचे काम करु नये. तसेच दोन दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहेत. त्यावर देखील त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केले. पत्राचाळ प्रकरणी मी बैठकीला हजर होतो असा ईडीने आरोप केला आहे. तर माझी लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी. तसेच आरोप सिद्ध नाही झाले तर, आरोप करणाऱ्याला राज्य सरकार काय करणार असा प्रतिप्रश्न देखील शरद पवार यांनी यावेळी विचारला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी