29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रShilpa Bodkhe : आधारकार्ड नसल्याने रुग्णालयाने महिलेला प्रसुतीसाठी नाकारले

Shilpa Bodkhe : आधारकार्ड नसल्याने रुग्णालयाने महिलेला प्रसुतीसाठी नाकारले

सरकारी अनाव्यवस्थेचा फटका यवतमाळ येथील एका गरीब महिलेला बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ आधारकार्ड नसल्याचे कारण पुढे करत गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयाकडून नाकारण्यात आले आहे.

राज्यात नवे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत सापडलेली जनता आता राग व्यक्त करू लागली आहे, सरकारला लक्ष द्या म्हणून विणवू लागली आहे, परंतु राज्यातील सत्ताकारणात व्यस्त असलेले सरकार काहीसे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या अनाव्यवस्थेचा फटका यवतमाळ येथील एका गरीब महिलेला बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ आधारकार्ड नसल्याचे कारण पुढे करत गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयाकडून नाकारण्यात आले आहे. पुर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांनी या दुर्देवी घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून याकडे लक्ष वेधून घेतले आहे.

शिल्पा बोडखे यांनी या संतापजनक घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे. ट्विटमध्ये शिल्पा बोडखे लिहितात, आरोग्य दुत अशी ओळख असलेल्या मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? यवतमाळ येथील मारेगाव ग्रामीण रूग्णालयात प्रसुती वेदनेने विव्हळत असताना गरीब महिलेला केवळ आधार कार्ड नसल्याने भरती करून घेतले नाही हि अत्यंत संतापजनक घटना आहे, असे म्हणून त्यांनी नव्या सरकारला धारेवर धरले आहे. यामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टॅग केले आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : भाजपने एकनाथ शिंदेंना का फोडले, शरद पवारांनी सांगितले कारण

Azadi Ka Amrit Mahotsav मराठी कलाकारांचा कार्यक्रम हटवून, अमराठी कार्यक्रमाचे राज्यपालांनी केले उदघाटन !

Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना

शिल्पा बोडखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या मारेगाव येथील आरोह या ग्रामीण रुग्णालयात अर्चना सोळंकी या महिलेने प्रसुतीसाठी धाव घेतली, परंतु केवळ आधार कार्ड नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल केले नाही. अर्चना सोळंकी यांची अत्यंत गरीबीची परिस्थिती असल्यामुळे तिच्या दोन वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत आहे, अशातच शासकीय रुग्णालयाने नाकारल्याने तिच्यासमोर प्रश्न उभा राहिला आणि वेदनेने ती तशीच कळवळत राहिली.

दरम्यान, काही सामाजिक संस्थेचे लोक तिच्या मदतीस धावून आले. तिला तात्काळ खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आणि तिची डिलीवरी करण्यात आली. जर हे लोक नसते तर त्या महिलेचे आणि तिच्या बाळाच्या जीवाचे काय झाले असते असा सवालच शिल्पा बोखडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून विचारला आहे. शिवाय घडलेल्या प्रसंगी डाॅक्टरांचे त्वरीत निलंबन करावं आणि इथून पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी आपण दक्षता घ्यावी अशी बोडखे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी