29 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरमहाराष्ट्रगृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार शिल्पा शेट्टी; 'सुखी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार शिल्पा शेट्टी; ‘सुखी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच!

गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डान्स क्वीन म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ हा नवा चित्रपट येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ‘सुखी’ येथे 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाईल. ‘सुखी’ चित्रपटात शिल्पा गृहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे. नवरा, मुलगी आणि सासऱ्यांच्याभोवती ‘सुखी’चं विश्व फिरतं. घर संसारात ‘सुखी’पुरती अडकला नाही सुखी आता पुरती कंटाळली आहे. नवऱ्याच्या सततच्या मागण्या, मुलीचे वाढते नखरे पाहत ‘सुखी’ घर संसारातून काही काळ ब्रेक घेऊ इच्छिते. ‘सुखी’ कॉलेजच्या मैत्रिणींना भेटायला जाते. आपल्याला न जुमानता ‘सुखी’ सरसकट निघून गेल्याने तिचा नवरा पुरता वैतागतो. पुढे काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी शिल्पाचा चित्रपट पाहावा लागेल.

‘सुखी’ चित्रपटात शिल्पासह अमित साद,कुश कपाडिया, पवलीन गुजराल, डेलनास इरानी, चैतन्य चौधरी आणि ज्योती कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे. सोनल जोशी यांनी ‘सुखी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘टी’ सिरीजचे भूषण कुमार यांनी ‘सुखी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिल्पाचे गेल्या दोन वर्षात ‘हंगामा२’ आणि ‘निकम्मा’ चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना फारसं यश लाभलं नाही. ‘सुखी’ चित्रपटाची कहाणी फारशी खास नाही. करिअरच्या सुरुवातीपासूनच शिल्पाचे जवळपास सर्वच सिनेमे फ्लॉप ठरले. ‘बाजीगर’ आणि ‘धडकन’ वगळता शिल्पाचे चित्रपट फारसे चालले नाहीत. ‘गदर२’ आणि ‘जवान’ चित्रपटांच्या स्पर्धेत ‘सुखी’ फार काळ टिकणार नाही, असा अंदाज चित्रपट व्यापार तज्ञांनी व्यक्त केला.

शिल्पा शेट्टी गेली अनेक वर्ष चित्रपटात फारशी दिसत नव्हती. छोट्या पडद्यावरच्या रियालिटी शो च्या माडीमतून तिने आपले दर्शक, चाहते टिकवून ठेवले होते. नवे चांगले चित्रपट तिला काही मिळत नव्हते, त्यामुळे टी हिन्दी चित्रपटापासून काहीशी लांब होती असे बोलले जायचे.
हे सुद्धा वाचा
शाहरुख खानच्या ‘जवान’ने दुपारपर्यंत कमावले २० कोटी; पण….
एकनाथ शिंदे आयोजित दहिहंडी उत्सवाला प्रियकरासोबत आली रकुल प्रीत
बोगस ओएसडी अधिकाऱ्याच्या कारनाम्याने मुख्यमंत्री कार्यालय कोमात


वास्तविक पाहता कोणत्याही अभिनेत्रीचे लग्न झाल्यावर टी काही वर्ष सिनेमापासून लांब राहते. नंतर अशा अभिनेत्रीला हिरॉईनच्या भूमिका काही मिळत नाही. त्यांना चित्रपटात आई असो वा चरित्र अभिनेत्री, सह कलाकार म्हणून रोल मिळतात. अनेक गाजलेल्या अभिनेत्रीनी त्यातही आपली छाप उमटवली आहे. बागवान मधील हेमा मालिनी असो श्रीदेवी, माधुरी दीक्षित वा अन्य अभिनेत्रींनी अफलातून कामे केली आहे. आता ही संधि शिल्पाला मिळाली आहे. त्याचे ती सोने करते की पितळ, चांदी  हे पहावे लागेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी