33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रकल्याण उपशहर प्रमुखावर शिंदे समर्थकाचा हल्ला

कल्याण उपशहर प्रमुखावर शिंदे समर्थकाचा हल्ला

टीम लय भारी

कल्याण : राज्यात सध्या उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक(Shinde Supporter) वाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी नाशिकमध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आज बुधवारी (दि. २० जुलै २०२२) सकाळी कल्याणमधील उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत हर्षवर्धन पालांडे जखमी झाले आहेत. कल्याणमधील शिंदे समर्थक असलेले आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती पालांडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन पालांडे हे सकाळी कामावर जात असताना कल्याण पूर्व येथील संतोषी माता या परिसरात तीन ते चार लोकांकडून पालांडे यांची गाडी अडवण्यात आली. त्यानंतर त्यांनी मिळून पालांडे यांच्यावर तलवार आणि रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पालांडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

कल्याण उपशहर प्रमुखावर शिंदे समर्थकाचा हल्ला

ज्या हल्लेखोरांनी हल्ला केला त्यांनी यावेळी पालांडे यांना धमकावले सुद्धा आहे. हे हल्लेखोर माजी नगरसेवक आणि शिंदे समर्थक असलेले महेश गायकवाड यांचे साथीदार आहेत. हे हल्लेखोर महेश गायकवाड यांच्यासोबत शिवसेनेत काम करतात. अशी माहिती हर्षवर्धन पालांडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

पण पालांडे यांनी केलेल्या आरोपाचे महेश गायकवाड यांनी खंडन केले आहे. सदर घटना आणि झालेला हल्ला दुर्दैवी आहे. पण या घटनेशी माझा काडीमात्र संबंध नसल्याचे महेश गायकवाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपस करून कारवाई करावी, माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करू, असा इशाराही माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कल्याण शहरात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे समर्थक वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास कोळशेवाडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

पुन्हा घात! नाशकात शिवसेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

प्राध्यापक नरकेंनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारण सोडणार ?

संजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी