28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना हा 'नोंदणीकृत' राजकीय पक्ष; शिवसेना 'गट' नाही- संजय राऊत

शिवसेना हा ‘नोंदणीकृत’ राजकीय पक्ष; शिवसेना ‘गट’ नाही- संजय राऊत

टीम लय भारी

नवी दिल्ली: खासदार गजानन किर्तीकर, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे आदी सर्व खासदार शिवसेनेत आहेत. जे काही वृत्त दाखवण्यात आलं, ते कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ विधीमंडळात झाला. त्याचा लवकर निकाल सुप्रीम कोर्टात लागणार आहे. असे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत म्हणाले. आज शिवसेनेचे 12 ते 14 खासदार शिंदेगटाच्या बैठीला ऑनलाईन उपस्थित होते, असे वृत्त प्रसार माध्यमांनी दाखवले होते. त्यानंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी खास त्यांच्या शैलीत बंडखोर नेत्यांचा समाचार घेतला.

लवकरच फुटीर गटाच्या भवितव्याचा निर्णय कोर्टात लागेल. आम्हाला खात्री आहे की, शिवसेनेने १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका कोर्टात दाखल केली, ती याचिका पक्की आहे. आम्हाला न्याय मिळेल. खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत पुढे म्हणाले, फुटीर गट शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो? तो फुटीर गट आहे. गटाला पक्ष मान्यता देखील नाही. हा गट बाळासाहेबांच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो. त्यानंतर दुसरी कार्यकारिणी जाहीर करतो. त्यामुळे हा कॉमेडी एक्सप्रेस सिझन २ आहे.

सोडून गेलेल्यांची धडपड सुरू आहे. सोडून गेले तरी शिवसेना भक्कमपणे उभी आहे. शिवसेनेचं नेतेमंडळ हे बाळासाहेबांनी निर्माण केलं आहे. शिवसेना हा ‘नोंदणीकृत’ राजकीय पक्ष आहे. शिवसेना ‘गट’ नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. कोणत्याही गटाला कार्यकारिणी स्थापन करण्याचा अधिकार नाही. त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. कॉमेडी एक्सप्रेस सिझन १ मुंबईत झाला. दुसरा दिल्लीत सुरू आहे. बाळासाहेबांची शिवसेना मातोश्रीतून चालेल. फुटीर गटाने तुम्ही वेगळा संसार थाटा, आमचं काहीच म्हणणं नाही, असंही राऊत म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

नक्की वाचा: ‘द्रौपदी टुडू मुर्मू’ यांची जीवन कहाणी

बॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा डाव पोलिसांनी उधळला

पावसाच्या पाण्याने घातला विदर्भाला वेढा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी