26 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रशिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

शिवसेना खासदारांचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

टीम लय भारी

मुंबईः शिवसेनेच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला 19 खासदारांपैकी 4 खासदार अनुपस्थित होते. शिवसेनेच्या 15 खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. त्या राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवार आहेत. एका अदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यावा, असे मत खासदारांनी मांडले. मात्र संजय राऊतांचा या निर्णयाला विरोध होता. त्यांनी बैठकीत विरोध दर्शवला नसला, तरी देखील त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. त्यांनी या विषयावर माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नेहमी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देणारे संजय राऊत आज माध्यमांना चुकवत थेट सामनाच्या दिशेने निघाले.

आजच्या सभेला शिवसेनेचे गजानन कीर्तिकर, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर ,राजेंद्र गावित तर शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई हजर होते. त्यामध्ये भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, कलाबेन डेलकर अनुपस्थित होते.

हे सुध्दा वाचा :

नाशिकची पाणी कपात टळली

शिंदे गटातील आमदार म्हणतात ‘मंत्री पद कोणाला नकोय?’

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई येथे भरती सुरु

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!