29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रपालघरमध्ये शिवसेनेला बसला मोठा धक्का

पालघरमध्ये शिवसेनेला बसला मोठा धक्का

टीम लय भारी

पालघर : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीचे सत्र काही थांबण्यास तयार नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यापासून दररोज कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनेचा दुसरा गट असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पालघरमधील जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शविला.

शुक्रवारी रात्री घडलेल्या या राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णतः संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पालघर संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे पालघरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. परंतु शुक्रवारी रात्री घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खूप मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पालघर मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत होती. परंतु अखेर शुक्रवारी रात्री मुंबईतील आनंदवन येथे पालघर मधील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शविला.

यावेळी पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, सारिका निकम, मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील, जव्हार, मोखाडा आणि तलासरी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दिला.

हे सुद्धा वाचा :

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांचे पितळ पाडले उघडे!

संसदेबाबतच्या बिनबोभाट निर्णयांवरून सुप्रिया सुळे यांनी उपटले केंद्र सरकारचे कान

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!