34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रशिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

शिवाजीराव आढळराव यांनी फोडले संजय राऊत यांचे बिंग

टीम लय भारी

मुंबई: शिवसेनेचे नेते शिवाजीराव अढळराव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांचे बिंग फोडले. 2009 साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. तेव्हा मला संजय राऊत म्हणाले की, शरद पवार शिरूर लोकसभा लढवतील, तुम्ही मावळ लोकसभा लढवा. त्यामुळं उद्धव ठाकरेंची सभा तूर्तास आपण घेणार नाही. आपली युतीची बोलणी सुरू आहेत. मी म्हणालो आपलं बोलणं सुरू आहे ना! मग दोन दिवसांनी शरद पवारांची सभा आहे. ती पण रद्द करायला सांगा. ते म्हणाले, आता आपण त्यांना कसं काय सांगणार, मग मी म्हणालो, मला का सांगताय, असं म्हणून मी निघून आलो.

काही वेळानं फोन आला, उद्धव ठाकरे साहेब येतायेत सभेची तयारी करा. मग त्याचवेळी मला शरद पवारांनी दोन वेळा राज्यसभेवर घेण्याची ऑफर दिली होती. मी बाळासाहेबांना सांगितलं आणि त्यानंतर युतीचा प्रस्ताव फेटाळला. मावळ आता पुणे नंतर बारामतीतून लढा म्हणाले असते. आज जी महाविकास आघाडी झाली ती 2009 लाच झाली असती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकारिणीत उपनेतेपद दिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज शिरूरमधील शिवसैनिकांची बैठक बोलावली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय का घेतला. हे सांगण्यासाठीच आज बैठक घेतल्याचं शिवाजीराव आढळराव यांनी सांगितलं. गेली अडीच वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचा घणाघाती आरोपही यावेळी बोलताना आढळराव यांनी केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहतील आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतील, असंही यावेळी बोलताना आढळरावांनी स्पष्ट केलं. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्हाला खूप आनंद झाला. आता शिवसैनिकांना मोठी ताकद मिळेल, न्याय मिळेल. पण दुर्दैवानं ज्यांच्या विरुद्ध लढलो. त्यांच्यासोबत आम्हाला मांडीला मांडी लावून बसावं लागलं. तरी आम्ही काही बोललो नाही. पण मुख्यमंत्री आमचे आणि गुन्हे कोणावर दाखल झाले. तर शिवसैनिकांवर उद्धव ठाकरे साहेबांना मी याची कल्पना द्यायचो.  एकदाच फक्त अधिकारी माझ्यापर्यंत आले. मात्र त्यानंतर काही प्रतिसादच मिळाला नाही. असं शिवाजीराव आढळराव म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

किरीट सोमय्यांना शिवसेनेतील माहिती पुरवणारा ‘खबरी’ कोण ?

’उध्दव ठाकरेंनी शरद पवारांची साथ सोडावी’ – रामदास कदम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी