30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमराठमोळ्या वाडा संस्कृतीची साक्ष देणारे शिवाजीनगर मेट्रो स्थानक

मराठमोळ्या वाडा संस्कृतीची साक्ष देणारे शिवाजीनगर मेट्रो स्थानक

पुण्यातील शिवाजी नगर मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून, पुण्याचा एतिहासिक वारसा सांगणारी अशी ही इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना याच पुण्यभूमीत केली. शिवरायांचे नाव असलेल्या या स्थानकाकडे पाहिले की, मराठेशाहीच्या वारशाची वारशाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. या इमारतीची रचना अस्सल मराठमोळ्या वाडा संस्कृतीची प्रचिती देणारी आहे.
Shivajinagar metro station in Pune is complete, represents Wada culture

पुणे मेट्रोचे शिवाजी नगर स्थानक पुण्याच्या सौंदर्यात भर घालणारे असून, अस्सल मराठमोळा सांस्कृतिक बाणा जपणारे स्थानक आहे. स्थानकाच्या इमारतीचे 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्खानकाची अंतर्गत रचना देखील वाडा संस्कृती जपणारी अशीच आहे. पुण्यात एतिहासिक लाल महाल, शनिवार वाडा, केसरी वाडा, नाना वाडा, विश्रामबाग वाडा असे अनेक वाडे आजही इतिहासाची साक्ष देतात. पुण्यातील अनेक वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले, तर काही मोडखळीस आलेले आहेत. पुण्याच्या वाडा संस्कृतीला साजेसे असे स्थानक पुणे मेट्रोने उभारले असून या स्थानकाचे सौंदर्य पाहताक्षणी नजरेत भरते.

Shivajinagar metro station in Pune is complete, represents Wada culture

हे सुद्धा वाचा

टपाल खात्याद्वारे व्यवसायाची संधी: 5 हजारांत लाखो कमवा; जाणून घ्या सविस्तर योजना

पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ आरोपाला शरद पवारांचं सडेतोड उत्तर 

डेडलाईन हुकणार; 75 हजार मेगाभरती आचारसंहितेत अडकणार!

Shivajinagar metro station in Pune is complete, represents Wada culture
स्थानकाची रचना जरी एतिहासिक वास्तूसारखी असली तरी शिवाजीनगर स्थानक अत्याधुनिक सुविधा असलेले आधूनिक सोईयुविधांनी परिपूर्ण आहे. या स्खानकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे भूमिगत स्थानक आहे. प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकात अत्याधूनिक लिफ्ट आहेत. छोटी रेस्टोरंट्स आहेत. छोटीमोठी दुकाने देखील या स्थानकात असणार आहेत. प्रवाशांना अत्यंत सुखद अनुभव देतानाच पुण्याचा एतिहासिक साज देखील या स्थानकाला देण्यात आलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी