28 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरमहाराष्ट्रपुण्याचा शिवराज राक्षे झाला 'महाराष्ट्र केसरी'

पुण्याचा शिवराज राक्षे झाला ‘महाराष्ट्र केसरी’

65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari 2023 Tournament) शिवराज राक्षे (Shivraj Rakshe)आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात अंतिम लढत झाली. अतिशय थरारक अशा या लढतीत शिवराज राक्षे यांने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिकंत मानाची गदा पटकाविली. तर महेंद्र गायकवाड उपविजेता ठरला. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होती. (Shivraj Rakshe became the winner of the Maharashtra Kesari 2023 Tournament)

आज शेवटचा अंतिम सामना असल्याने राज्यभरातून कुस्ती शौकिन हा सामना पाहण्यासाठी पुण्यात आले होते. अंतिम लढतीत शिवराज राक्षे यांने महेंद्र गायकवाडला चितपट केले. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या मल्लास महिंद्रा थार आणि रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस तर उपविजेत्या मल्लास ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

नितीन गडकरी यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड हे दोन्ही पैलवान पुण्याच्या तालमीतच तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या येथील असून वस्तात काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो.
महेंद्र गायकवाड हा मूळचा शिरसी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथिल आहे. ते देखील वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्यावतिने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी