28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकिल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी

टीम लय भारी

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणून, शिवस्वराज्य दिनापासून प्रेरणा घेता यावी या उद्देशाने ६ जून हा शिवराज्य दिन म्हणून महाराष्ट्र साजरा करीत आहे. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. (shivrajyanhishek sohala at raigad)

रायगडवर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची जय्यत तयारी

या ठिकाणी येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी खास लक्ष देण्यात आले आहे.रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोड च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

  • अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने युवराज संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला आहे. शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे.
  • गडावर व पायथ्याशी ३५ ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह ४ ठिकाणी आरओ वॉटर सुविधा उपलब्ध.
  • गडाच्या पायथ्याला,पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केलेली आहे.
  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी केली जाणार. मात्र येथून शिवप्रेमींना ये-जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत.
  • गडावर हॅलोजन व इतर वीजपुरवठा सेवा सज्ज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाने आवश्यक ती तयारी केली आहे.
  • रायगडावर ये-जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात करण्यात आले आहेत.
  • त्याचबरोबर ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
  • यंदाच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची तसेच जागर शिवशाहिरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम आकर्षण ठरणार आहेत.
  • राजसदरेवर होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी मेघडंबरीसमोर शिवप्रमींना बसण्यासाठी व हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या मंडपाची सोय करण्यात आली आहे.
  • महसूल,पोलीस,सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज.

हे सुद्धा वाचा : 

एकच धून सहा जून! रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची QR कोडच्या माध्यमातून गैरसोय टळणार

रायगडात मृद व जलसंधारण विभागाची चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

मध्य रेल्वेने “फक्त एक पृथ्वी” संकल्पनेनुसार जागतिक पर्यावरण दिन २०२२ साजरा केला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी