22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रtata airbus project: महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंडी, आरत्या, फटाके, मोर्च्यांपुरतेच मर्यादीत रहायचे का?;...

tata airbus project: महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंडी, आरत्या, फटाके, मोर्च्यांपुरतेच मर्यादीत रहायचे का?; छगन भुजबळ यांचा सवाल

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना, तो आता गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून, महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित रहायचे का?

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना, तो आता गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून, महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित रहायचे का?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, हा प्रकल्प नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच पत्राद्वारे केली होती. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचे दु:ख असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.
सप्टेंबर २०२१ मध्ये भारत सरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी २२ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच ३१ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकल्प नाशिकच्या ओझरमध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दिल्लीत आपले वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगतानाच ते म्हणाले वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले होते, मात्र त्या उलट महाराष्ट्रातीलच प्रकल्प एकापाठोपाठ एक राज्याबाहेर जात आहेत. त्यामुळे याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. देशाच्या नेत्यांनी गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये अशी टीका त्यांनी यावेळी केली.
हे सुद्धा वाचा :

Supriya Sule : आता गावागावात विचारतात ताई 50 खोक्यांचे काय झाले?, यावर मी म्हणते…

Nana Patole : फडणवीस सरकारच्या काळात इतके प्रकल्प गुजरातला गेले; नाना पटोले यांची घणाघाती टीका

संतापजनक : दगडाच्या काळजाचे अधिकारी, ऐन दिवाळीत कर्णबधिर शाळांचे पगार लटकवले

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. सत्ताधारी शिदे गट आणि भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे सांगत आहेत. तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप करत आहेत. सत्तेतील पक्ष केंद्रातील नेत्यांच्या मनाला भावेल असाच कारभार करत आहेत, त्यामुळेच महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!