33 C
Mumbai
Wednesday, May 17, 2023
घरमहाराष्ट्र'गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा'

‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्यांना वारंवार गद्दार म्हंटले जाऊ लागल्याने चांगलेच संतापलेले आहेत. ज्यामुळे आता या आमदारांकडून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणाऱ्यांना मारण्याची भाषा सुद्धा हिंगोलीमध्ये झालेल्या एका बैठकीत केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंडखोरी करून शिवसेनेचे ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर त्यांना बंडखोर, गद्दार (traitors) अशी नावे मिळाली. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. ज्यामुळे या आमदारांनी आम्ही बंडखोर नाही असे सांगितले. तर आम्ही ज्या शिवसेनेत आहोत, तीच शिवसेना खरी शिवसेना असून आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, असे या बंडखोरांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. पण तरी सुद्धा आमदार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा आणि खासदारांचा ‘गद्दार’ म्हणूनच उल्लेख करत आहेत.

पण आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्यांना वारंवार गद्दार म्हंटले जाऊ लागल्याने चांगलेच संतापलेले आहेत. ज्यामुळे आता या आमदारांकडून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणाऱ्यांना मारण्याची भाषा सुद्धा हिंगोलीमध्ये झालेल्या एका बैठकीत केली आहे.

कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे ऐन बहुमत चाचणीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. पण त्याआधी बांगर यांनी भावुक होऊन सर्व बंडखोर आमदारांना शिवसेना पक्षात परत येण्याचे आवाहन केले होते. पण नंतर मात्र ते स्वतः शिंदे गटात सहभागी झाले होते. पण आता तर संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणाऱ्यांना मारण्याची भाषा केली आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे हेच बंडखोरांना गद्दार म्हणत आहेत. मग आता संतोष बांगर त्यांनाच मारणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचे काम शिवसैनिकाने करावे. आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. धान्यात ठेवा. आम्हाला जर कोणी आरे म्हंटले तर त्याला कारे नाही बोलणार तर त्याच्या कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य संतोष बांगर यांच्याकडून यावेळी करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या खमक्या भूमिकेचे केले कौतुक

उध्दव ठाकरेंनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

आयआयटी मुंबईतील शुल्कवाढी विरोधात अ‍ॅड. अमोल मातेले यांचा घेराव घालण्याचा इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी