30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रShree Sevagiri Lecture Series : श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन

Shree Sevagiri Lecture Series : श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन

या व्याख्यानमालेचे उद्घाटन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. प. पू. श्री हनुमानगिरी महाराज यांच्या 42 व्या पुण्यतिथी निमित्ताने पुसेगाव येथील श्री सेवागिरी (Shree Sevagiri)महाराज देवस्थान ट्रस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव व न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे स्वरूप भव्य असून श्री सेवागिरी मंदिराच्या प्रांगणात 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान रोज सायंकाळी 5 वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव यांनी दिली.

सेवागिरी देवस्थानच्या व्याख्यानमालेचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. सोमवारी 22 ऑगस्टला महात्मा गांधींचे पणतू व गांधी विचारवंत तुषार गांधी हे 75 वर्षानंतर भारत गांधींच्या स्वप्नातील आहे का?’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी 23 ऑगस्टला सातारा येथील अभिनेते किरण माने यांचे ‘माझा अभिनय प्रवास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवारी 24 ऑगस्ट रोजी पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘संत तुकाराम महाराजांची शिकवण’ या विषयावर व्याख्यान होईल, तर गुरुवारी 25 ऑगस्टला पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. हरी नरके हे ‘महात्मा फुले यांचे काही नवे पैलू’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

Manish Sisodia : मनीष सिसोदिया केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर

Raju Srivastav : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा नाहीच

Blood Donation Camp : लग्नघाईत रक्तदानाचा मुहूर्त

शुक्रवारी 26 ऑगस्टला पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ‘ग्रामविकास काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शनिवारी 27 ऑगस्ट रोजी पुणे येथील मराठा आरमाराचे अभ्यासक व साहित्यिक अनिकेत यादव यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार’ या विषयावर व्याख्यान होईल. रविवारी 28 ऑगस्टला पुणे येथील नामवंत कीर्तनकार ह.भ. प. प्रमोद महाराज जगताप हे ‘संतचरित्र’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

सोमवारी 29 ऑगस्ट रोजी प. पू. श्री हनुमानगिरी महाराज यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 11 वाजता समाधीस महाअभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या व्याख्यानमालेचे उद्घाटन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

या व्याख्यानमालेवर बोलताना श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष (बाळासाहेब) जाधव म्हणाले, पुसेगाव आणि पंचक्रोशीतील रसिक साहित्यप्रेमी श्रोत्यांना अपूर्व पर्वणी असलेल्या वाङ्‌मयाचे संयोजन सोमवार दि. 22 ते रविवार दि. 28  या सप्ताहात करण्यात आले आहे, तरी रसिक वाङ्‌मयप्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी