29 C
Mumbai
Monday, November 27, 2023
घरमनोरंजनश्यामची आई' लवकरच प्रदर्शित होणार !

श्यामची आई’ लवकरच प्रदर्शित होणार !

‘श्यामची आई’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येईल? याकडे सर्व चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. वर्षभरापासून ह्या चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. हा चित्रपट श्यामची आई या कादंबरीवरून घेतला आहे. या पुस्तकाचे लेखक हे साने गुरुजी आहेत. अनेक महिन्यांपासून चर्चा असणाऱ्या श्यामची आई या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर आला आहे. या चित्रपटाची तारीख देखील आता समोर आली असून दिवाळीच्या मुहुर्तावर 10 नोव्हेंबर रिलीज होणार असून या सिनेमाचा टिझर हा श्यामची आई भूमिका करणाऱ्या गौरी देशपांडेंनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

आतापर्यंत अनेक थोर पुरुषांवर सिनेमे झाले आहेत. ते प्रदर्शित होऊन त्यांनी चांगली कमाई देखील केली आहे. मात्र असं असलं तरीही चित्रपट प्रदर्शनापूर्वी थोर पुरुषांच्या चित्रपटांची एवढी चर्चा नव्हती. तेवढी चर्चा आत या सिनेमाची होऊ लागली आहे. एवढच नाही तर या सिनेमाच्या सर्वच बाबी अगदी भक्कम असल्याचे टिझरमध्ये पाहायला मिळालं आहे. टीझरमध्ये साने गुरुजींचा काळ दाखवण्यात आल्याने कृष्णधवल पद्धतीची चित्रफीत आहे. यामुळे हा सिनेमा अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.

&

हेही वाचा 

मला मारू नका… इस्रायलच्या 25 वर्षीय मुलीचं हमासकडून अपहरण; व्हिडिओ आला समोर

नुशरत युद्धभूमी इस्त्रायलमधून सुखरूप पोहोचली भारतात

तब्बल ३२ वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र झळकणार मोठ्या पडद्यावर!

चित्रपटाचा टिझर पाहिल्यास अनेक वर्षांपूर्वीचा काळ अनुभवायला मिळणार आहे. तसेच श्याम म्हणजे मुलगा आणि त्याची आई यांच्यातील नाते, प्रेम, माया थोडक्यात काय तर आई आणि मुलाच्या नात्यातील गोडवा, कडवटपणा, मुलाचा खट्याळपणा सांगणारी कथा असणार आहे. हि कथा आणि पटकथा सुप्रसिद्ध दिगदर्शक सुनील सुकथनकर यांनी लिहली आहे. तर संवाद, सेट, दृश्य चित्रपटातील भूमिका करणारे कलाकार हे अनुभवी असून अभिनयाच्या माध्यमातून चार चांद लावले आहेत.

चित्रपटातील स्टारकास्ट 

या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजे साने गुरुजींच्या भूमिकेत कोण असेल असा प्रश्न पडला असेल मात्र साने गुरुजींच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता ओम भुतकर आहे. मुळशी पॅटर्न मधील ओम भुतकर आणि श्यामची आई या चित्रपटही ओम भुतकारच्या अभिनयाची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे , गंधार जोशी, अनिकेत सागवेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी