34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

राज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

टीम लय भारी

मुंबई : हिंदुमध्ये फुट पाडणाऱ्या मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलावून घ्यावं (Signature campaign to send Governor to Delhi). त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात युवासेने कडून स्वाक्षरी मोहीम (Signature campaign) राबवण्यात येणार आहे. उद्या दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेत युवासेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

काल (दि. 30 जुलै 2022) राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. आज राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच नितेश राणे वगळता सर्वांनीच त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी देखील आम्ही राज्य पालांच्या मताशी सहमत नसल्याचे सोशल मीडियावर केले आहे.

सर्व पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांच्या मनात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर जे अमराठी लोक आहेत. ज्यांचे पिढ्यान पिढ्या मुंबई ठाण्यात उद्योग धंदे आहेत. त्या गुजराती, राजस्थानी नागरिकांनी देखील राज्यापालांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हंटले आहे.

हे सुध्दा वाचा:

एका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची छत्रपती संभाजी महाराजांची मागणी

राज्यपालांच्या भूमीकेवर शरद पवारांची बोचरी टीका

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी