33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रSix Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

आपल्या देशात कार अपघाताचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढले आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारसाठी सहा एअरबॅग (six air bags) अनिवार्य करण्याचा‍ निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून हा नियम लागू होणार आहे. हा निर्णय या वर्षीच घेण्यात येणार होता. मात्र तो एक वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे. जागतीक सप्लायवर त्याचा परिणाम होईल‍ त्यासाठी हा निर्णय एक वर्ष पुढे ढकलण्यात आला. काही दिवसांपूर्वी प्रवाशांची सुरक्षीतता विचारात घेऊन सरकारने आठ सीटवाल्या वाहनांना सहा एअर बॅग असणे बंधकारक केले होते.

हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार होता. याविषयावर ट्वीट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागतीक व्यापार सारखळीवर त्याचा परिणाम होईल त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय 1 वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला असल्याचे सांगितले. लोकांच्या हितासाठीच सहा एअरबॅग (six air bags) अनिवार्य करण्यात आल्या होत्या. भारतात रस्ते अपघातामध्ये मरण पावणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. भारताच्या रस्त्यांवर दर मिनीटाला ‍1 रस्ता अपघात होतो. तर 17 मिनीटाला एकाचा बळी जातो. त्यापैकी 10 अपघात हे व्यवसायाशी निगडीत असतात.

हे सुदधा वाचा

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

CDS : भारताच्या ‍संरक्षणदल प्रमुख पदी अन‍िल चौहान यांची नियुक्ती

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

चालकाच्या अनावघानाने, नजरचुकीने, यांत्र‍िक बिघाडामुळे, मानवी चुकीमुळे, वाहतुक नियमांचे पालन न केल्याने तसेच गाडी चालवण्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने अनेक वेळा रस्ते अपघात होतात.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त रस्ते अपघात होतात. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांचा नंबर लागतो.

काही दिवसांपूर्वी सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये महामार्गावर रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यावेळी सारस मिस्त्री हे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला नव्हता. त्या वेळी दोघांचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रस्ते अपघाताचा विषय ऐरणीवर आला होता. त्यावेळीच कारला सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी