28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस सोडून स्नेहल जगताप उद्धव ठाकरेंच्या गटात; आमदार योगेश गोगावलेंना आव्हान देणार

काँग्रेस सोडून स्नेहल जगताप उद्धव ठाकरेंच्या गटात; आमदार योगेश गोगावलेंना आव्हान देणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर होते. त्यानंतर रायगडमधील महाड येथे शनिवार (दि.6) रोजी सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेत काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे यांनी पक्षात फुट पाडल्यानंतर रायगडमधील शिवसेनेचे तीनही आमदार शिंदेंसोबत गेले. त्यामुळे ठाकरेंसाठी रायगडात मोठे आव्हान उभे होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी रायगडमध्ये संघटनमजबूतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. महाडचे आमदार योगेश गोगावले यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना उभे केले जावू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

स्नेहल जगताप या काँग्रेसचे दिवंगत नेते माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. कोरोना काळात माणिकराव जगताप यांचे कोरोना काळात निधन झाले. त्यानंतर स्नेहल जगताप यांच्याकडे महाड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व सोपवले, स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा देखील राहिल्या आहेत. महाडमध्ये आमदार योगेश गोगावले यांची मोठी ताकद आहे. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर अनेक शिवसैनिक अद्याप देखील ठाकरेंसोबत आहेत. अशावेळी गोगावले यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची रायगडमध्ये ताकद वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश करुन घेतल्याचे मानले जाते.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

पवई आयआयटी : दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

WWE स्टार सारा लीच्या आत्महत्येबाबत मोठा खुलासा

स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील होत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची संपूर्ण ताकद स्नेहल जगताप यांच्या मागे उभी करुन गोगावले यांच्या विरोधात त्यांना आगामी निवडणूकीत उमेदवारी दिली जावू शकते. स्नेहल जगताप यांनी ”महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्यांना झुकवण्यासाठी व महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर नेहमी फडकण्यासाठी ‘आबा मी आज उध्दवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहे, आबा तुमच्या आशिर्वादा बरोबरच उध्दवसाहेबांची ही साथ आहे. आता बघू महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाच्यात ताकत आहे.” असे ट्विट करत आता पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार असल्याचाच संदेश दिला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी