लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुक होणार आहे. या निवडुणकांसाठी सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून, नागरिकांचे मन जिंकायचे प्रयन्त करत आहे. यातच आता सामाजिक चळवळीतील काही कार्यकर्त्यांची महाविकास आघाडीला मागणी केली आहे.त्यांनी एका पत्राद्वारे सरकारला मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी विधानसभेची उमेदवारी देताना काही विचार करण्याची मागणी केली आहे. (social movements workers request to Mahavikas aghadi think about legislative candidacy)
Jaykumar Gore | साड्या वाटपाचा पचका | Vidhansabha Election 2024
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. भाजप सरकारचा संविधान विरोधी कारभार आणि संविधान बदलण्याबाबत भाजपाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्यांमुळेच मतदारांनी दिलेली ती प्रतिक्रिया होती.(social movements workers request to Mahavikas aghadi think about legislative candidacy)
Jaykumar Gore | निवडणूक आयोगाचा निर्णय, जयकुमार गोरेंची पंचाईत | भाजपसमोर यक्षप्रश्न
पुढे त्यांनी म्हटले की, संविधान विरोधी कारभार सुरु असताना भाजपमध्ये आता फूट पडत असून, त्यातील काही कार्यकर्ते जनमत पाहून आता इंडिया आघाडी मध्ये येवू शकतात. त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, त्यांना विधानसभेची उमेदवारी द्यायची की नाही हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीतील पक्षांनी अशा आयाराम, गयाराम प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ नये अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे. अशा लोकांना उमेदवारी दिल्यास आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सदर उमेदवाराचे समर्थन करणे अवघड आहे. (social movements workers request to Mahavikas aghadi think about legislative candidacy)
तसेच, आम्ही सामाजिक चळवळीत असणारे कार्यकर्ते त्या मतदार संघात सदर उमेदवाराचे काम करू शकणार नाहीत. हा आमचा निर्णय असेल. कुठलाही पक्ष चालवताना व वाढवताना तुमच्या समोरील आव्हाने आम्ही समजू शकतो, पण राजकारणात मूल्ये, नैतिकता व विचार महत्वाचा आहे हे आपणास मान्य व्हावे. त्यामूळे ही बाब तात्पुरत्या फायद्यापेक्षा दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टीने विचारात घेतली जावी असा आमचा आपणाकडे रास्त आग्रह आहे. (social movements workers request to Mahavikas aghadi think about legislative candidacy)
अडचणीच्या काळात आपला पक्ष सोडून व्यक्तिगत स्वार्थासाठी जी मंडळी भाजपात गेली आहेत किंवा ज्यांनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे अशा पक्ष बदलू लोकांच्या पश्चात महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जुन्या – नव्या कार्यकर्त्यांनी तो पक्ष सांभाळला आहे, वाढवला आहे. पक्ष बदलू लोकांना उमेदवारी दिल्यास प्रामाणिकपणे पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय केल्यासारखे होईल, तसेच मूल्यनिष्ठांचा देखील अनादर घडणार आहे. म्हणून पक्ष सोडून गेलेल्यांना उमेदवारी देणे जनमताला रुचणार नाही.
2014 नंतर मूल्यांचे आणि नैतिकतेचे राजकारण संपले आहे, असे आपण मानत असाल तर 2024 मध्ये मूल्ये आणि नैतिकतेचे राजकारण महाराष्ट्रात रुजविण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्यादृष्टीने आपल्याकडून संविधानिक जबाबदारी निभविण्याची अपेक्षा आहे. (social movements workers request to Mahavikas aghadi think about legislative candidacy)
सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये डॉ.जी.जी.पारीख,मुंबई,तुषार गांधी,मुंबई,अविनाश पाटील,धुळे,नितीन वैद्य,मुंबई,धनाजी गुरव,सांगली,अर्जुन डांगळे,मुंबई,विश्वास उटगी,ठाणे,माधव बावगे,लातूर,सुभाष वारे,पुणे,ॲड. वर्षा देशपांडे, सातारा,सुरेश खोपडे, बारामती,संभाजी भगत,मुंबई,शरद कदम,मुंबई,डॉल्फी डिसोझा,मुंबई,फिरोज मिठीबोरवाला,मुंबई,इरफान इंजिनियर,मुंबई,नरेंद्र डुंबरे,ओतूर,मच्छिंद्र मुंडे,डोंबिवली,सतीश सुर्वे,जळगाव,राजवैभव शोभा रामचंद्र,कोल्हापूर,अँड.सविता शिंदे,सोलापूर,अभिजीत हेगशेट्ये,रत्नागिरी,श्रीकांत लक्ष्मी शंकर,सासवड,गुड्डी,मुंबई,विशाल विमल,पुणे,सत्यजित चव्हाण,राजापूर,सीताराम शेलार,मुंबई,राजाभाऊ अवसक, संगमनेर ,माया वाकोडे,अमरावती,अल्लाउद्दीन शेख,पनवेल,बाबा नदाफ,कोल्हापूर,संदीप भावसार,नाशिक,नितीन वाळके,मालवण,प्रा.दीपक पवार,मुंबई,राजेंद्र बहाळकर ,पुणे,निसार अली सय्यद,मुंबई,नासिर हुसेन शरीक मसलत,मिरज,राज असरोंडकर, उल्हासनगर,प्रकाश हिवाळे,मुंबई,संतोष आंबेकर,मुंबई,सुरज भोईर,मुंबई,शाकीर शेख,मुंबई,श्रीनिवास शिंदे,डॉ.जालिंदर अडसुळे,मुंबई,डॉ.सुरेश खैरनार,नागपूर,प्रकाश मानेकर ,अमरावती,संदीप तडस ,अमरावती,प्रदीप पाटील ,अमरावती,शांताराम चव्हाण ,अमरावती,धनंजय कुकडे ,अमरावती,भारत कल्याणकर ,अमरावती,राजाभाऊ महाजन ,अमरावती,अशोक वाकोडे ,अमरावती,वर्षा सगणे ,अमरावती,विवेक वाडेकर,अमरावती,शिरीन खान ,अमरावती,आकाश इंगळे,अमरावती,मुकुंद काळे,अमरावती,दिलीप लाडे ,अमरावती,दिगंबर मेश्रम,अमरावती,बतुल शाह,अमरावती,वसंतराव कराळे पाटील,अमरावती,राजेश इशी, दोंडाईचा,धुळे,शहाजी पाटोदेकर,मुंबई , यांचा समावेश आहे.