माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे(Decision of Election Commission, Panchayat of Jayakumar Gore). लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी माण – खटाव मतदारसंघामध्ये दुसरा दौरा नुकताच केला. औंध परिसरातील पाच – सहा गावे, कुरोली, एनकूळ, खातवळ, येलमरवाडी, पिंगळी, बिजवडी अशा गावांमधील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेतल्या.
Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार
जयकुमार गोरे फक्त निवडणुकीपुरतेच गावात येतात. गेल्या १५ वर्षांत गोरे यांनी माण – खटावचा पाणी प्रश्न सोडविला नाही. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम नाही. त्यांना शिक्षण क्षेत्रातील काहीच कळत नाही. शेती, ग्रामविकास या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास नाही. जयकुमार गोरे हे उद्धट व आडदांड असे व्यक्तीमत्व आहे. ते सामान्य लोकांसोबत व्यवस्थित बोलत नाहीत. १५ वर्षात त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे अभाव आहे,
अशा पद्धतीच्या भावना सामान्य लोकांनी लय भारीशी बोलताना व्यक्त केल्या. जयकुमार गोरे यावेळी निवडून येतील अशी शक्यता नाही. त्यांना सामान्य जनता कंटाळली आहे. प्रभाकर देशमुख हे सुसंस्कृत व मवाळ असे व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख निवडून येतील अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या. बाजूच्या मतदारसंघात असलेले बाळासाहेब पाटील व जयकुमार गोरे या दोघांमध्ये जमीन आस्मानचा फरक असल्याच्याही भावना लोकांनी व्यक्त केल्या.