देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) यांच्यात अनेक चांगले गुण आहेत, तसे वाईटही गुण आहेत. गेल्या १० वर्षांत फडणवीस हे महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत(Devendra Fadnavis supported Jaykumar Gore). या १० वर्षांत त्यांना अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या, पण त्यांनी चांगल्या पेक्षा वाईट गोष्टी जास्त केल्या आहेत. त्यामुळं फडणवीस यांच्याविषयी मला व्यक्तिगत पातळीवर आदर असला तरी त्यांनी केलेल्या चुकांवर आसूड ओढणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर आम्ही अधिकच ताकदीनं आसूड ओढणार आहोत. किंबहूना, फडणवीस यांनी केलेल्या या मोठ्या भ्रष्टाचाराची संपूर्ण फाईल माझ्याकडं आहे. हा भ्रष्टाचार राधाकृष्ण विखे पाटील(radhakrushna vikhe patil) यांनीच बाहेर काढलेला होता. पण तो चव्हाट्यावर आलेला नाही. तो भ्रष्टाचार सुद्धा मी लवकरच चव्हाट्यावर आणणार आहे.
देवेंद्र फडणविसांच्या एका लाडक्या आमदाराचा. या आमदाराला गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर घेतलं. त्याचे सगळे फाजिल लाड पुरविले. या बिनडोक व गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला त्याच्या मतदारसंघात बेधूंद कारभार करता यावा म्हणून गृहखात्याचा, महसूल खात्याचा वाट्टेल तसा वापर करू देण्याची संधी फडणवीस यांनी करून दिलीय. पण या महाप्रतापी आमदाराने अशी काही घाण करून ठेवलीय की, ती अख्ख्या भाजपला अडचणीत आणणारी ठरणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या आमदाराच्या प्रतापावर ताशेरे ओढले आहेत. गृहखात्याची तर पुरती अब्रु निघाली आहे. या आमदाराने केलेले प्रताप म्हणजे विरोधकांना आयतंच कोलीत मिळालंय. ऐन विधानसभा निवडणुकीत या आमदाराचे प्रताप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेवून भाजप हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे, हे ठासून सांगण्याची संधी
विरोधकांना मिळाली आहे. या महाडेंजर आमदाराचे नाव आहे, जयकुमार गोरे. हे जयकुमार गोरे प्रकरण इतकं डेंजर आहे की, बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी ‘लखोबा लोखंडे’ या नावाने जयकुमार गोरे यांना निश्चितपणे उपाधी दिली असती. छगन भुजबळ यांच्यापेक्षाही जयकुमार गोरे यांना ‘लखोबा’ ही उपाधी कशी अधिक समर्पक आहे, असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच सांगितले असते. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण न्यायव्यवस्था अजून शाबूत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेच या जयकुमार गोरे यांची व देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याची पुरती चंपी केलीय. ज्या माणसाला काळीज आहे, तो माणूस जयकुमार गोरे व त्यांच्या भाजपला शिव्याशाप दिल्याशिवाय राहणार नाही.
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ड्रिम प्रोजेक्टला त्यांच्याच कार्यकाळात लागली घरघर