23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रमाणचे सुपुत्र अजित पवार यांना जलप्रहरी पुरस्कार जाहीर

माणचे सुपुत्र अजित पवार यांना जलप्रहरी पुरस्कार जाहीर

दहिवडी तालुका माण येथील जलदूत समाजसेवक अजित ज्ञानदेव पवार यांना जलसुरक्षा जल बंद जलप्रबंध यासाठी उपयुक्त काम केल्याबद्दल जलप्रहरी हा पुरस्कार घोषित झाला असून येणाऱ्या 18 डिसेंबर 2024 रोजी संयोजक अनिल सिंह यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. (Jalpahri Award announced to Ajit Pawar, son of Man Taluk)

 

पवार यांनी शासनाने जी जागा बंधाऱ्यासाठी रद्द केली होती त्याच ठिकाणी दहिवडी रानमळा येथील ओढ्यावर लोकसभागातून व लोकवर्गणीतून तीन बंधारे बांधली यामुळे 1000 एकर क्षेत्र उडता खाली आणले त्यानंतर मानगंगा नदीवर सर्वात मोठा बंधारा उभा केला त्यांना पाणी फाउंडेशनचे समन्वयक म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी 2017 पासून माण तालुक्याचे प्रत्येक गाव पीजून काढले. प्रशासनाबरोबर अहोरात्र साडेचारशे हुन जास्त ग्रामसभा घेतल्या लोक वर्गणीतून कोट्यावधी रुपयाचा निधी उभा करून आणि गावी टँकर मुक्त बनवण्याच्या दिशेने प्रयत्न केले तालुक्यामध्ये हजारो झाडे लावून त्याचे संगोपन करण्याची दिशा दिली. (Jalpahri Award announced to Ajit Pawar, son of Man Taluk)

 

माण तालुका बरोबरच मान खटाव, कोरेगाव, फलटण, बारामती, कर्जत, जामखेड,बीड आष्टी यासारख्या गावात जाऊन पाण्याचे महत्व पटवून दिले अनेक ठिकाणी ग्रामसभा घेऊन व स्वतः श्रमदान करून लोकांना जलसंधारणाची दिशा दिली त्यांनी पाहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली दहिवडी सारख्या ठिकाणी रयत संकुल मध्ये दहा हजार मुले शिक्षण घेत असताना त्यांना मोफत जागा मिळवून देऊन मुलाची पाण्याची सोय केली बंधाऱ्याच्या लगत हजारो झाडे उभी करून आज उभी आहेत. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या बाबतीत मार्गदर्शनासाठी प्रयत्न केले मार्गदर्शनाखाली अनेक गावात भांडण तंटे कमी होऊन श्रमदानाची दिशा मिळालीमहिला बचत गट परस बाग विषमुक्त शेती साठी गेली 15 वर्षे त्याचे काम अविरत चालू आहे. (Jalpahri Award announced to Ajit Pawar, son of Man Taluk)

 

या अगोदर माणदेश फाउंडेशन पुणे यांच्यासहअनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आजचा हा जलप्रहरी पुरस्कार त्यांना घोषित झाला असल्याने जलदूताचा सन्मान झाल्याने जनतेमधून आनंद व्यक्त होत आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी