22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रNCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले...

NCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले कारण

शिंदे-फडणवीस सरकारच्या न होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या लांबल्या गेलेल्या विस्तारावरून जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. सध्या तरी या सरकारमधील 20 मंत्र्यांची फौज संपूर्ण राज्याचा गाडा हाकताना दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडी सरकारला सत्तेच्या गादीवरून खाली खेचल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. शिंदे-फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतर या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये भाजपच्या आठ आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. पण ऑगस्ट महिन्यात झालेल्या या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अद्यापही परत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

शिंदे-फडणवीस सरकारच्या न होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या लांबल्या गेलेल्या विस्तारावरून जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यावर ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही, ते जर का नाराज होऊन बाहेर पडले तर याच भीतीमुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि या मंत्रिमंडळात ज्या आमदारांना स्थान देण्यात आले नाही ते नाराज आमदार बाहेर पडले तर शिंदे-फडणवीस सरकारचे संख्याबळ कमी होईल. याचा परिणाम शिंदे गटावर होईल आणि त्यामुळे शिंदे गट अडचणीत येईल, म्हणून अजूनही या सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला नसल्याचे कारण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे जाहीर करायचा अधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. कदाचित याबाबत फडणवीस यांनी आपले मत मांडलं असावं असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

हे सुद्धा वाचा

Mumbai Police : जनतेला सुरक्षितता देणाऱ्या मुंबई रेल्वे पोलिसांचं ट्विटर अकाउंट हॅक!

Supriya Sule : आता गावागावात विचारतात ताई 50 खोक्यांचे काय झाले?, यावर मी म्हणते…

संतापजनक : दगडाच्या काळजाचे अधिकारी, ऐन दिवाळीत कर्णबधिर शाळांचे पगार लटकवले

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. तीच पोलीस भरती या सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उद्योग-धंदे महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचे काम सुरु आहे. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरत आहे. हे सरकार अद्यापही नवीन असे कोणतेच काम करू शकलेले नाही. त्यामुळेच सरकारच्या या नाकर्तेपणामुळे जनता यांना पुन्हा निवडून देईल का ? असा प्रश्न निर्माण झाल्याने या सरकारकडून निवडणुका पुढे ढकलण्याचे काम सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. सांगली येथे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!