30 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रKothurne Rape : कोथुर्णे बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ 'अॅक्शन मोड'मध्ये

Kothurne Rape : कोथुर्णे बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ ‘अॅक्शन मोड’मध्ये

मावळ येथे सात वर्षीय लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचे आता सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा यावर निषेध व्यक्त केला आहे.

मावळ येथील कोथुर्णे (Kothurne rape) गावातील सात वर्षीय लहान मुलीचे अपहरण करण्यात आले होते. बुधवारी तिचा मृतदेह संशयास्पद  गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे सापडला त्यावेळी तिच्यावर बलात्कार करून निर्घुण खून करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि अपराध्यांवर कठोर कारवाईची मागणीचा सूर उमटू लागला. दरम्यान या घटनेनंतर चित्रा वाघ सुद्धा आता अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहेत. वाघ यांनी सोशल मीडियावर घडलेल्या घटनेचे वर्णन केले असून, त्यांनी पीडितेच्या कुंटुंबियांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. शिवाय आरोपींना फाशीची शिक्षा होणारच असा त्यांनी विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर कोथुर्णे बलात्कार प्रकरणी अधिकची माहिती दिली आहे. चित्रा वाघ ट्विटमध्ये लिहितात, मावळ तालुका कोथुर्णे गावातील घटना अत्यंत वेदनादायी आहे 7 वर्ष चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केली गेली यात सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे यात आरोपीच्या आईचा ही सहभाग आढळला आरोपी व त्याची आई दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय कोथुर्णेगावी मुलीचे आई-वडील ग्रामस्थांची भेट घेतली… असे म्हणून चित्रा वाघ यांनी त्यांच्या भेटीबाबत सांगितले.

हे सुद्धा वाचा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

या प्रकरणात आरोपीची आई अंगणवाडी सेविका होती तिच्याकडे गावातील किमान २० लहान मुलं/मुली जात होती त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडलाय का याचीही माहिती समुपदेशनाची टीम गावात पाठवून घ्यावी यासाठी @puneruralpolice यांना विनंती केलीये त्यानुसार आज समुपदेशनाची टीम गावात पोहोचेल. सदर आरोपीने याआधी ही दोनदा गावातील लहान मुलींसोबत अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती ग्रामस्थांकडनं मिळाली पण त्यावेळेस ही प्रकरण दाबली गेली कुणीही पुढे येऊन पोलिसात तक्रार केली नाही त्यामुळेच या हरामखोर आरोपीची हिंमत वाढली व एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला.. असे म्हणून त्यांनी घडलेल्या प्रसंगानंतर संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

BEST : ‘बेस्ट’ने सुरु केली प्रवाशांसाठी नवी सुविधा

Nilesh Rane : निलेश राणेंनी दीपक केसरकरांना देऊ केली वाहनचालकाची नोकरी!

Eknath Shinde : ‘प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो’

चित्रा वाघ पुढे लिहितात, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी बजरंग दल व विश्व हिंदु परिषद यांनी पुकारलेल्या उपोषणाच्या ठिकाणी @BalaBhegade सह भेट घेतली…या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavisजी यांच पुर्ण लक्ष असून SP ना योग्य सुचना दिलेल्या आहेत..कोथुर्णे घटनेत लवकरात लवकर सुनावणी होत आरोपींना फाशीची शिक्षा होणारचं शिवाय उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ लवकरचं उपमुख्यमंत्र्याच्या भेटीला जाणार आहे ..आश्वस्त झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले हि लढाई आपल्या सगळ्यांचीचं ती आपण एकत्रीतपणे लढू व विकृतीला हद्दपार करू असे म्हणून त्यांनी पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळणार असा विश्वास चित्रा वाघ यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान भेटीबाबतची माहिती चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असली तरीही त्यामध्ये केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख दिसून येत आहे. मंत्रीमंडळ नसल्याने मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतील या घटनेत मुख्यमंत्र्यांचे आदेश, सूचना किंवा त्यांचा साधा उल्लेख सुद्धा चित्रा वाघ यांनी केलेला नाही. केवळ देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळणार असे वाघ यांनी म्हटले आहे, त्यामुळे सर्वोच्च पदाचा अधिकार नेमका कोणाकडे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी