29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

Mahadev Jankar : महादेव जानकर हे निर्मला सीतारमण यांच्यापेक्षाही सरस !

निर्मला सीतारमण या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. महादेव जानकर हे विधानपरिषदेतील आमदार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. केंद्रातील मंत्रीपदाचे वलय असल्याने सीतारमण यांचा ‘प्रोटोकॉल’ मोठा ठरतो. शिवाय त्या नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या विश्वासातील नेत्या आहेत. या उलट महादेव जानकर प्रोटोकॉलला महत्व देत नाहीत. कुणाही गरीबाच्या घरी जायचे, अन् चटणी भाकर खायची. अगदी झोपडीतही मुक्काम ठोकायचा, अशा पद्धतीने जमिनीवर पाय असणारा नेता म्हणून जानकर यांची प्रतिमा आहे. निर्मला सीतारमण या मातब्बर केंद्रीय मंत्री आहेत. पण त्या लोकाभिमूख नाहीत. जनतेत त्यांची फार क्रेझ नाही. या उलट महादेव जानकर हे तळागाळातील नेते आहेत. त्यांचा चाहता वर्ग सुद्धा अफाट मोठा आहे.

महादेव जानकर व निर्मला सीतामरण या दोन्ही व्यक्तींची खरेतर तुलना करण्याचे काहीच कारण नाही. मात्र लवकरच येऊ घातलेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही तुलना करणे आवश्यक आहे. मोदी – शाह यांनी बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी भाजप आतूर आहे.

हे सुद्या वाचा

Maharashtra Politics : ‘भाजपचे नेते 100 टक्के खोटे बोलतात, मग अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे…

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंवर राग काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी केले गोरगरीबांचे वाटोळे

BMC Election 2022: उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

बारामतीमध्ये पवार कुटुंबाला अडचणीत आणले की, महाराष्ट्र पादाक्रांत करायला मोकळे असा भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्वाचा होरा आहे. त्यासाठी बारामती मतदारसंघाची जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्याकडे देण्यात आली आहे. लवकरच सीतारमण बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत.सुप्रिया सुळेंची लोकसभा निवडणूक म्हटली की, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची आठवण येते. सन २०१४ मध्ये महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात जोरदार लढत दिली होती.

सुळे यांचा त्यावेळी निसटता विजय झाला होता. महादेव जानकर यांना त्यावेळी साधारण ४ लाख ५१ हजार मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार मते मिळाली होती. जेमतेम ६९ हजार मतांनी सुळे यांचा विजय झाला होता.
रांगडा गडी म्हणून जानकर यांच्याकडे त्यावेळी राजकारणातील प्रस्थापित नेते दुर्लक्ष करायचे. पण जानकर यांची क्षमता गोपीनाथ मुंडे यांनी ओळखली होती. त्यामुळेच त्यांनी जानकर यांना बारामतीमध्ये पाठींबा दिला होता. जानकर यांची धनगर व बहुजन समाजात मोठी क्रेझ आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळाली होती. पवार कुटुंबियांसाठी सुद्धा हा मोठा धक्का होता.

महादेव जानकर यांच्या या लोकप्रियेतेचा भाजपने नंतर मात्र फायदा उचलला, जानकर यांचा युझ ॲण्ड थ्रो सुद्धा केला. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रणनिती ठरविण्यासाठी निर्मला सीतारमण जे करू शकणार नाहीत, त्यापेक्षा जास्त महादेव जानकर करू शकतील. जानकर यांच्या या क्षमतेची भाजपच्या नेत्यांना फिकीर नाही, अन् तमाही नाही, अशी भावना जानकरांच्या चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी