28 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा...

MLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा आदर्श

निधनाच्या तिसऱ्या दिवसानंतर आवश्यक अस्थींचे कलशात संकलन करून लाल फडक्याने या कलशाचे मुख बांधले जाते. पंचक्रिया, दशक्रिया अथवा तेराव्या दिवशी पवित्र नदीत विधीवत अस्थी विसर्जन करण्यात येतात. मात्र अस्थी विसर्जन करण्याच्या या पारंपारिक रूढी परंपरेला फाटा देऊन अस्थी नदीत विसर्जन न करता एक आंब्याचे रोप लावून या झाडामध्ये स्व. शोभाकाकींच्या अस्थी विसर्जित करण्याचा बाबर निर्णय घेतला.

शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार अनिल बाबर (MLA Anil Babar) यांच्या पत्नी शोभाकाकी बाबर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बाबर कुटुंबियांनी एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. बाबर कुटुंबियांनी आंब्याचे एक रोपटे लावले आहे. या रोपट्याभोवती दिवंगत शोभाकाकी बाबर यांच्या अस्थी विसर्जित केल्या आहेत. भविष्यात हे रोपटे वृक्षाचे रूप धारण करेल तेव्हा ते फळे आणि सावलीच्या रूपाने समाजाला सेवा देईल. शोभाकाकींनी त्यांच्या हयातभर लोकांना माया लावली होती. त्यांच्या या स्मृती कायम राहाव्यात म्हणून बाबर कुटुंबियांनी अनोख्या पद्धतीने त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.

दिवंगत शोभाकाकी बाबर यांच्या दोन्ही चिरंजीवांनी आणि बाबर कुटुंबियांनी जुन्या रुढी – परंपरेला फाटा देत हा पर्यावरणपुरक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यावर अस्थी विसर्जन हा हिंदू धर्म परंपरेत मान्यता असलेला एक संस्कार आहे. निधनाच्या तिसऱ्या दिवसानंतर आवश्यक अस्थींचे कलशात संकलन करून लाल फडक्याने या कलशाचे मुख बांधले जाते. पंचक्रिया, दशक्रिया अथवा तेराव्या दिवशी पवित्र नदीत विधीवत अस्थी विसर्जन करण्यात येतात. मात्र अस्थी विसर्जन करण्याच्या या पारंपारिक रूढी परंपरेला फाटा देऊन अस्थी नदीत विसर्जन न करता एक आंब्याचे रोप लावून या झाडामध्ये स्व. शोभाकाकींच्या अस्थी विसर्जित करण्याचा बाबर निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचाn

Azadi ka Amrit Mahotsav : आरटीओकडून अनोखी ‘तिरंगा रॅली’

Dahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

ही अनोखी प्रथा बाबर कुटुंबातील नगरसेवक अमोल बाबर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, खानापूर तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, जयंत बाबर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या मळ्यात हे आंब्याचे रोप लावण्यात आले.

MLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा आदर्शMLA Anil Babar wife : आमदार पत्नीचे निधन, कुटुंबियांनी घालून दिला आगळावेगळा आदर्श

सध्या ग्लोबल वॉर्मिगमुळे पर्यावरण धोक्यात असताना गेलेल्या व्यक्तीच्या नावे एखादे रोप लावले तर त्याचा वृक्ष होईपर्यंत त्याची काळजीही घेतली जाईल. आणि गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी, स्मृतीही चिरंतन राहतील हा बाबर कुटुंबियांनी विचार केला. त्यानुसार बाबर कुटुंबियांनी जुन्या रुढी-परंपरेला फाटा देत स्व. शोभाकाकीची आठवण कायमस्वरूपी स्मरणात रहावी यासाठी पर्यावरणपूरक निर्णय घेतल्याने बाबर कुटुंबियांच्या या अभिनव निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बाबर कुटुंबियांच्या या अभिनव उपक्रमाचा आदर्श समाजातील सर्व घटकांनी घेतला पाहिजे, अशी भावना समाजातून व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी