34 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रभाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ

माण खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३६ ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली ताकद दाखवत २० ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मतमदारसंघात भाजपच्या ताब्यातील पाच मोठ्या गावांतील भाजपची सत्ता देखील राष्ट्रवादीने हिसकावल्यामुळे जयकुमार गोरे यांच्यासाठी हा  मोठा धक्का मानला जात आहे. (NCP top Man Khatav taluka grampanchayat elections)

राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तालुक्यात वाढली आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे १६ सरपंच थेट जनतेतून निवडून आले आहेत. तर एकुन ग्रामपंचायत सदस्यांमध्ये देखील राष्ट्रवादीचेच सर्वाधिक १५४ सदस्य निवडून आले आहेत. माण तालुक्यातील भाजपच्या ताब्यातील वावरहिरे, विरळी, मलवडी, पळशी, वरकुटे मलवडी या पाच मोठ्या ग्रामपंचायती देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. तर पुळकोटी, शिरताव, पांगरी, नरवणे या चार गावांमध्ये देखील सर्वाधिक ग्रामपंचाय सदस्य राष्ट्रवादीचेच निवडुन आले आहेत. या चार ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचाच ग्रामपंचायत सदस्य असणार आहे.

NCP top Man Khatav taluka grampanchayat electionsभाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात राष्ट्रवादी वरचढ
हे सुद्धा वाचा
बीडीडी चाळींची कामे नियमानुसारच, पीडब्ल्यूडीचे स्पष्टीकरण

ओमिक्रॉन बीएफ 7 : चीनमध्ये कहर माजवणाऱ्या कोरोना व्हेरीएंटचे भारतात चार रुग्ण; जुलैतच गुजरातमध्ये आढळले होते पहिले प्रकरण; सरकारला जाग आली निवडणुका आटोपल्यांनतरच!! 

‘शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा कंपन्यांकडून १०० रुपयांचा धनादेश देणे लाजीरवाणे’

ज्या ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी १६, भाजप १५, शिवसेना उध्दव ठाकरे गट ०३, अनिल देसाई गट ०१, अपक्ष ०१ असे थेट सरपंच निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात जास्त १५४ सदस्य निवडून आले असून भाजप १२५ सदस्य निवडून आले आहेत. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे ०१३ सदस्य, अपक्ष ०८ निवडून आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी