30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रPune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलन करत खेळले खेळ

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलन करत खेळले खेळ

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील खेळ खेळत शिंदे-भाजप सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची मात्र सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा खेळामध्ये सहभाग केला. ज्यामुळे गोविंदा पथकांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. याशिवाय गोविदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. या घोषणेमुळे तर दहीहंडी पथकातील गोविंदा आणखीनच खूष झाले. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचा अनेकांनी विरोध करत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर गोट्या, विटीदांडू आणि लपाछपी खेळत शिंदे-भाजप सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देखील खेळ खेळत शिंदे-भाजप सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची मात्र सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे.

पुण्यातील रःटरवडी काँग्रेसच्या युवतींकडून या अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रस्त्यावर आंदोलनकर्ते ठाण मांडून बसले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावरच सापशिडी, बुद्धिबळ, विटीदांडू, गोट्या यांसारखे खेळले. त्याचसोबत त्यांनी डोंबाऱ्यांना बोलवून त्यांना देखील त्यांचा खेळ दाखविण्यास सांगितलं.

याचसोबत राष्ट्रवादीच्या महिलांनी मंगळागौर खेळत रस्त्यावर फुगडी सुद्धा घातली. यावेळी अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. मंगळागौरीचा खेळ खेळात महिलांनी शिंदे-भाजप सरकारकडून देण्यात येणाऱ्या सरकारी नोकरीच्या पाच टक्के आरक्षणामध्ये आम्हाला सुद्धा आरक्षण द्या, अशी मागणी केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाही, पण दहिहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे, त्यामुळे आता सर्व प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

Amol Mitkari On Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटला अमोल मिटकरींनी दिले उत्तर

MPSC Students : एमपीएससी विद्यार्थ्यांचे सरकारविरोधात अनोखे आंदोलन

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

सध्याचे शिंदे-भाजप सरकार हे नव्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास करण्याची नाही तर, खेळ खेळण्याची गरज आहे. असे या सरकारकडून नव्या पिढीला सूचित करण्यात येत असल्याचे मत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त कऱण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण शिंदे-भाजप सरकारवर या अनोख्या आंदोलनाचा काही परिणाम होणार कि नाही. तसेच हे सरकार घेत असलेले निर्णय हे फक्त जनतेला आनंदी करण्यासाठी आहे, असे एक ना अनेक प्रश्न विरोधक आणि जनता यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी