30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रRajesh Tope : राजेश टोपेंना पाहताच कुत्रा आनंदला...

Rajesh Tope : राजेश टोपेंना पाहताच कुत्रा आनंदला…

राजकीय नेते नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांचे राजकारण, समाजकारण, विरोधक – सत्ताधाऱ्यांतील टिका टिप्पणी यांमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. राजकीय कारकीर्दीविषयी जाणून घेण्यासाठी जितके लोक उत्सुक असतात त्याही पेक्षा त्यांच्या वयक्तीक आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यात लोकांना कमालीचा रस असतो. दरम्यान राष्ट्रवादी नेते राजेश टोपे यांनी ट्वीटरवर शेअर केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. गडबडीने मला येऊन बिलगणारा आणि माझ्यासोबत मस्ती करणारा, खेळणारा आमचा लाडका रोअर! असं म्हणून त्यांनी त्यांच्या लाडक्या श्वानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी रोअर राजेश टोपे यांच्या सोबत खेळताना दिसत आहे.

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे ट्विटमध्ये लिहितात की, राजकारणाच्या माझ्या धावपळीच्या जीवनात मी घरी आलो कि गडबडीने मला येऊन बिलगणारा आणि माझ्यासोबत मस्ती करणारा, खेळणारा आमचा लाडका रोअर ! मी जवळ असलो कि त्याला प्रचंड आनंद होतो, किती मस्ती करावी, अशी भावना त्याच्या मनात दाटून येत असावी! असे म्हणून रोअरचे कौतुकच त्यांनी येथे केले आहे.

हे सुद्धा वाचा

Mahadev Jankar : महादेव जानकरांचा इमानी बाणा

IAS अधिकाऱ्याने मानले ‘आई’चे आभार!

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

कोरोना काळात राजेश टोपे यांची कामगिरी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यांचे प्रसंगावधान, रुग्णांसाठीची तत्परता दाखवणारे टोपे यांनी जनमाणसांत एक वेगळीच ओळख निर्माण केली. दरम्यान त्यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर प्राण्यांबाबत असलेली आपुलकी सुद्धा लोकांसाठी औत्सुक्याचे ठरू लागले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!