30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रखळबळजनक : शरद पवारांनी आणलेल्या प्रकल्पाला रामराजे नाईक निंबाळकरांचा कोलदांडा !

खळबळजनक : शरद पवारांनी आणलेल्या प्रकल्पाला रामराजे नाईक निंबाळकरांचा कोलदांडा !

रामराजे नाईक निंबाळकर यांचे १२०० एकर जमिनीत स्वारस्य दडले आहे. त्यासाठी निंबाळकर यांना कोरेगावमध्ये कॉरिडॉर स्थलांतरीत करायचा आहे, अशा आशयाची पोस्ट भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांमार्फत व्हायरल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे डोके फिरले आहे की काय ? अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण त्यांचे नेते असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारस्थाने करायला सुरूवात केली आहेत. शरद पवारांच्या पुढाकाराने आकाराला येऊ घातलेल्या एका भव्य प्रकल्पाच्या विरोधात रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारस्थान रचले आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी भाजपसोबत संधान सुद्धा बांधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना दिली.सातारा जिल्ह्यातील माण – खटाव तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या तालुक्यांच्या लगतच माळशिरस, आटपाडी व सांगोला हे तालुके आहेत. या दुष्काळी तालुक्यांप्रती शरद पवार नेहमीच भावनिक असतात.

एखादी योजना राबविताना या तालुक्यांना ते नेहमीच झुकते माफ देतात. याच भावनेतून शरद पवार यांनी म्हसवड येथे ‘बंगळुरू – मुंबई आर्थिक कॉरिडॉर’ हा प्रकल्प उभारायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी माजी IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यामुळे ‘महाविकास आघाडी’ सरकारच्या काळात शरद पवार यांनी केंद्र सरकारचा हा भव्य प्रकल्प म्हसवड या ठिकाणी राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सुमारे ८ हजार एकर जमिनीचे निर्धारण झाले होते. आणि त्याबाबतची अधिसूचनाही जारी करण्यात आली होती. पण ‘महाविकास आघाडी’ सरकार गेल्यानंतर शरद पवारांचा हा प्रकल्प हाणून पाडण्याचे कारस्थान खुद्द रामराजे नाईक निंबाळकर यांनी रचले आहे.

नाईक निंबाळकर यांनी म्हसवडमध्ये होऊ घातलेला हा प्रकल्प कोरेगाव तालुक्यात नेण्याची तयारी पूर्ण केली आहे. नाईक निंबाळकर यांनी आपल्या सभापतीपदाच्या कालावधीत तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकून म्हसवड येथील जमीन कॉरिडॉरसाठी योग्य नसल्याचा अहवाल तयार करून घेतला असल्याचाही प्रकार समोर आला आहे.

एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हसवड येथील कॉरिडॉर रद्द व्हावा यासाठी चिकाटीने प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. भाजपचे स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांनी मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांचे कारस्थान हाणून पाडले आहे. जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी माण खटाव तालुक्यांविरोधात रचलेले कारस्थान हाणून पाडले असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

Abdul Sattar : अबब ! मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत 12 शिक्षक बोगस

रामराजे नाईक निंबाळकर यांचे १२०० एकर जमिनीत स्वारस्य

रामराजे नाईक निंबाळकर यांचे १२०० एकर जमिनीत स्वारस्य दडले आहे. त्यासाठी निंबाळकर यांना कोरेगावमध्ये कॉरिडॉर स्थलांतरीत करायचा आहे, अशा आशयाची पोस्ट भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांमार्फत व्हायरल करण्यात आली आहे.

माणवासियांसोबत रामराजेंची गद्दारी संतापजनक

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी सतत माण तालुक्याला ओरबाडण्याचे काम केले आहे. त्यांच्या काही शिक्षण संस्था माण तालुक्यात आहेत. रामराजे यांनी त्यांच्या फलटण मतदारसंघातील अनेकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे. फलटणमधील हे सरकारी नोकर माण तालुक्याच्या प्रशासनात नाईक निंबाळकर यांनी पेरून ठेवले आहेत. या नोकरदारांच्या माध्यमातून ते माण तालुक्यावर वर्चस्व ठेवतात. माण तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे, असा आभास रामराजे यांनी यापूर्वी अनेकदा केला आहे. परंतु माण तालुक्यात होऊ घातलेला आर्थिक कॉरिडॉर त्यांनी हाणून पाडला आहे. रामराजेंच्या या भयानक कारस्थानामुळे माण व खटाव तालुक्यातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना माण तालुक्यात पाय ठेवू द्यायला नको, अशी भूमिका स्थानिक जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रभाकर देशमुख – जयकुमार गोरे यांचे प्रयत्न कौतुकास्पद

जयकुमार गोरे व प्रभाकर देशमुख हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. परंतु माण तालुक्यात होऊ घातलेल्या आर्थिक कॉरिडॉरसाठी दोघांच्याही भूमिका समान आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रभाकर देशमुख यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या माध्यमातून हा कॉरिडॉर निर्माणासाठी प्रयत्न केले. ते फलद्रुपसुद्धा झाले. आता नव्या सरकारमध्ये जयकुमार गोरे यांनी चांगली भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून जयकुमार गोरे यांनी कॉरिडॉर माणमध्येच राहिला पाहीजे यासाठी जोर लावला असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी