30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रShrikant Deshmukh : महिलेच्या फसवणूक प्रकरणी श्रीकांत देशमुखांना न्यायालयाचा तुर्तास दिलासा

Shrikant Deshmukh : महिलेच्या फसवणूक प्रकरणी श्रीकांत देशमुखांना न्यायालयाचा तुर्तास दिलासा

जामीन अर्जावर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी श्रीकांत देशमुख यांच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. आशिष गायकवाड, अॅड.बाबासाहेब जाधव, अॅड. विनोद सुर्यवंशी, अॅड.अभिजीत इटकर, अॅड. निशांत लोंढे तर सरकार तर्फे अॅड. प्रदीपसिंह राजपूत, तर मूळ फिर्यादीतर्फे विद्यावंत पांधरे यांनी काम पाहिले.

महिलेचा फायदा घेत फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले असून तूर्तास देशमुख यांना यावर दिलासा देण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी तीन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयात हजर राहण्याचे कारण सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आले नाही असा युक्तीवाद अॅड मिलिंद थोबाडे यांनी न्यायालयात केला जो न्यायालयाने मान्य केला, त्यामुळे सोमवार पर्यंत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी दिले आहेत.

सोलापूर येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महिलेचे शोषण केल्याचा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पक्षाकडून तातडीने पावले उचलत देशमुख यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे देशमुख यांनी अटकपूर्व जामीन मिळावे यासाठी थेट न्यायालयच गाठले आहे. श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. यावेळी देशमुख यांनी कोर्टात हजर राहण्याबाबच्या अर्जावर युक्तीवाद करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाह, भाकर फाऊंडेशनचा मार्गदर्शन उपक्रम !

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यात दोनच ‘टिकोजीराव’, जाणून घ्या कुणाबद्दल…

यावेळी कोर्टात हजर राहण्याचे नेमके कारण दिले नाही म्हणून सरकार पक्षाने केलेला अर्ज नामंजूर करावा अशी विनंती अॅड. थोबाडे यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यान या जामीन अर्जावर ८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी श्रीकांत देशमुख यांच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. आशिष गायकवाड, अॅड.बाबासाहेब जाधव, अॅड. विनोद सुर्यवंशी, अॅड.अभिजीत इटकर, अॅड. निशांत लोंढे तर सरकार तर्फे अॅड. प्रदीपसिंह राजपूत, तर मूळ फिर्यादीतर्फे विद्यावंत पांधरे यांनी काम पाहिले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी