33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रDepartment of Archaeology : ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 5 हजार वर्षे ...

Department of Archaeology : ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 5 हजार वर्षे जुन्या गणेश मंदिरात पुरातत्त्व विभागाने केली तोडफोड

ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवेढा तालुक्यातील माणचूर येथील गणेश मंदिर पर‍िसरातील फरशांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवेढा तालुक्यातील माणचूर येथील गणेश मंदिर पर‍िसरातील फरशांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. माचणूर येथे सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचे महादेवाचे पुरातन मंदिर असून, अनेक साधू संत, ऋषीमुनींनी या ठिकाणी तप केले आहे. शुकाचार्य, वामनदेव, स्वामी समर्थ, शंकर महाराज यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आहे. हे मंदिर खूपच जुने असून, ते पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे. पुरातत्त्व विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी अनेक वेळा केली आहे. परंतु त्याची कोणीही दखल घेतलेली नाही.

याच महादेवाच्या मंदिरात गणेशाचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणात घाण साचली होती. एका भाविकाने फरशी बसवून घेतली होती. त्या भागाची साफसफाई केली हाेती. मात्र आता हे काम झाल्यानंतर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी माचणूर मंदिरात आले. त्यांनी कोणालाही न सांगत गणेश मंदिरात बसवलेल्या फरशीची तोडफोड सुरू केली. त्यामुळे स्थानिक भाविक आणि पुजारी यांनी विरोध केला आणि काम थांबवले. पुरातत्त्व विभागाला आजच गणेश चतुर्थीच्या दिवशी उत्खननाचा मुहूर्त सापडला. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.हे सुद्धा वाचा

Trupti Sandbhor : नांदेड वाघाला मनपाच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नवनियुक्ती

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

Sharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे – शरद पवार

या ठिकाणी औरंगजेबाची राजधानी होती. त्याकाळी औरंगजेबाने माचणूर मंदिराला दिल्ली दरबारातून बिदागी सुरु होती. हैद्राबाद संस्थानाकडून या मंदिराला बिदागी मिळत होती. या मंदिराला दरवर्षी श्रावण महिन्यात बिदागी येते. शेकडो वर्षांपासून स्था‍निक भाविकांनी या मंदिराची डागडुजी केली. एकदाही पुरातत्त्व विभागाचे (Department of Archaeology) अधिकारी मंदिराकडे फ‍िरकले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. पुरातत्त्व विभागाच्या नियमाचा भंग झाला असला तरी देखील गणेश चतुर्थीलाच तोडफोड का? केली असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी