30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAshtavinayak : लेण्याद्रीचा गिरजात्मक गणेश 'सहावा' विनायक

Ashtavinayak : लेण्याद्रीचा गिरजात्मक गणेश ‘सहावा’ विनायक

अष्टविनायकांमध्ये अतिषय सुंदर आशा पर्वतराईमध्ये वसलेला अष्टविनायक म्हणजे 'लेण्याद्री'चा गणपती. लेण्याद्रीच्या सुंदर आशा पर्वत रांगेत वसलेला' गिरिजात्मक' गणपती हा सहावा गणपती आहे. गिर‍िजात्मक म्हणजे पार्वतीचा पुत्र. पार्वतीला गिरीजा या नावाने देखील ओळखतात.

अष्टविनायकांमध्ये अतिषय सुंदर आशा पर्वतराईमध्ये वसलेला अष्टविनायक म्हणजे ‘लेण्याद्री’चा गणपती. लेण्याद्रीच्या सुंदर आशा पर्वत रांगेत वसलेला ‘गिरिजात्मक’ गणपती हा सहावा गणपती आहे. गिर‍िजात्मक म्हणजे पार्वतीचा पुत्र. पार्वतीला गिरीजा या नावाने देखील ओळखतात. अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंद‍िर पर्वतावर आहे. हे मंदिर 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहेमध्ये आहे. हे मंदिर आठव्या गुहेमध्ये आहे. त्यामुळे या गुहांना ‘गणेश लेणी’ असेही म्हणतात. हे मंदिर निसर्ग सानिध्यात आहे. बाजूला सुंदर हिरवळ असून, पावसाळयात इथला नजारा अर्वणीय असतो. त्यामुळे पावसाळयात पर्यटकांची गर्दी होते.

कथा :
गणेश पुराणामध्ये या कथेचा उल्लेख आहे. सती देवीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा प्रकट केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर घोर तपस्या केली. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी ‍तिने स्वत:च्या अंगाच्या मळापासून गणपतीची मुर्ती तयार केली. त्यामध्ये गणेशाने प्रवेश केला. तो तिच्या समोर सहा हात, तीन डोळे असलेला बालक बनून उभा राहिला.
त्यानंतर त्याने अनेक दैत्यांचा वध केला. गिरिजात्मक मंदिरात पोहोचण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंद‍िर दक्षिणमुखी असून, मूर्ती उत्तराभिमुख आहे. आपण मंदिरात प्रवेश केला की, गणपतीच्या पाठीचे पहिल्यांदा दर्शन घेतो. या पाठमोऱ्या गणपतीची पूजा केली जाते. या मंदिरात एकही वीजेचा बल्ब नाही. दिवसभर या मंदिरात उजेड असते. या मूर्तीची सोंड डावी आहे. मुतीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहे. हे मंदिर दगडात कोरलेले आहे. या मंदिराला प्रदक्ष‍िणा घालता येत नाही.‍

हे सद्धा वाचा

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

अष्टविनायक दर्शन : थेऊरचा ‘चिंतामणी’

या मंदिरासमोर दोन पाण्याची कुंड आहेत. या गणपतीचे दर्शन सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत घेता येते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला येथे यात्रा भरते. तर माघ प्रतिपदेला देखील उत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला 6.2 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहे. या डोंगरावर मोठया प्रमाणात माकडांचे वास्तव्य आहे. पुण्याहून नााशिकडे जातांना नारायणगाव ओझर मार्गे लेण्याद्री हे अंतर 8‍9 किमी आहे. पुण्यातून नाशिक महामार्गाने जुन्नर मार्गे हे अंतर 99 किमी आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी