29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAshtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती' रांजणगाव'चा महागणपती

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

अष्टविनायक दर्शन म्हणजे प्राचीन अशा स्वयंभू गणपतींचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिराला स्वत:चा एक इतिहास आहे. तसेच अख्याय‍िका आहे. प्रत्येक मंदिरातील मुर्त्या या वेगळया आहेत. त्यांची स्वत:ची वेगळी धाटणी आहे. या विव‍िध गणपतींची मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिर‍िजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धी विनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी विविध नावे आहेत.

अष्टविनायक दर्शन म्हणजे प्राचीन अशा स्वयंभू गणपतींचे दर्शन घेणे होय. या प्रत्येक मंदिराला स्वत:चा एक इतिहास आहे. तसेच अख्याय‍िका आहे. प्रत्येक मंदिरातील मुर्त्या या वेगळया आहेत. त्यांची स्वत:ची वेगळी धाटणी आहे. या विव‍िध गणपतींची मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिर‍िजात्मक, विघ्नेश्वर, सिद्धी विनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी विविध नावे आहेत. ही मंद‍िरे पुणे, अहमदनगर, रायगड जिल्ह्यात आहेत. ही मंदिरे पुणे शहरापासून जवळ आहेत. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांपैकी चवथा गणपती आहे. हे महागणपतीचे स्थान स्वयंभू आहे. अष्टविनायकांपैकी हा सर्वाधिक शक्तीमान गणपती आहे.

हा गणपती उजव्या सोंडेचा असून, कमळासनावर व‍िराजमान आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स.10 व्या शतकातील आहे. या गणेशाला दहा हात आहेत. प्रसन्न व मनमोहक अशी मूर्ती आहे. माधवराव पेशव्यांनी या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayaka Darshan : अष्टविनायक दर्शन- त‍िसरा गणपती भीमेच्या तिरावरचा ‘सिद्धटेकचा’ सिद्धिविनायक

VIDEO : अष्टविनायक दर्शन – पहिला गणपती मोरगावचा ‘मोरेश्वर’

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

त्यानंतर इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नुतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधला. हे मंदिर भगवान शंकरांनी वसवले असून, त्यांनीच या गणेश मूर्तीची स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अत‍िशय उन्मत्त झाला. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरुन भगवान शंकराने या विनायकास प्रसन्न केले.

कार्त‍िक शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी त्रिपुरासुराला भगवान शंकरांनी ठार मारले. त्यावेळपासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. हे ठिकाण पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यात आहेत. पुणे- अहमदनगर राज्य मार्गावर आहे. रांजणगाव पुण्यापासून 50 किमी अंतरावर आहे. तर शिरुरपासून 17 किमी अंतरावर आहे. येथून पुणे- सोलापूर महार्गावरील चौफुला येथे देखील जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी