27 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAshtavinayak Darshan : दुसरा गणपती - भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा 'चिंतामणी'

Ashtavinayak Darshan : दुसरा गणपती – भक्तांची चिंताहरण करणारा थेऊरचा ‘चिंतामणी’

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजे 'गणपती'. आपले इच्छीत कार्य सफल व्हावे यासाठी गणपतीला साकडे घातले जाते. आपल्या राज्यात अष्टविनायकांची देवळे प्रसिद्ध आहेत. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजे ‘गणपती’. आपले इच्छीत कार्य सफल व्हावे यासाठी गणपतीला साकडे घातले जाते. आपल्या राज्यात अष्टविनायकांची देवळे प्रसिद्ध आहेत. अष्टविनायक म्हणजे स्वयंभू गणपतीची आठ देवळे होय. ही मंदीरे निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या ठिकाणी असून, यातील अनेक मंदीरे नदी किनारी वसलेली आहेत. अष्टविनायक दर्शनांमध्ये पहिला गणपती हा मोरगावचा मयुरेश्वर असून, अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा ‘चिंतामणी’ गणेश होय. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा गपणती अशी त्याची ओळख आहे.

या मुर्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे डोळयात लाल मणी आण‍ि ह‍िरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू आहे. डाव्या सोंडेची ही मूर्ती आसन घालून पूर्वाभ‍िमुख बसलेली आहे. हे मंदीर पुर्णपणे लाकडापासून बनवलेले आहेत. युरोप‍ियन प्रवाशांकडून पेशव्यांना त्या काळात पितळेच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या आहेत. त्यातली एक घंटा थेऊरला आहे. या गणपतीने कदंब वृक्षाखाली गणासुराचा वध केला अशी आख्यायिका आहे. कप‍िलमुनींजवळ सर्व मनोकामना पूर्ण करणारे ‘चिंतामणी’ हे रत्न होते.

गणासुर नावाचा राक्षस एकदा त्यांच्या आश्रमात आला. कप‍िल मुनींनी त्याचा जेवण दिले. त्यानंतर त्याने चिंतामणी रत्न चोरले. कप‍िलमुनींनी रत्न परत मिळावे यासाठी श्री गणेशाची आराधना केली. गणेशाने गणासुराचा वध केला. मुनींना ते रत्न पर मिळवून द‍िले. त्यामुळे कप‍िल मुनींनी ते रत्न गणपतीच्या गळयात घातले. त्यावेळपासून गणपतीला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले.

पेशव्यांच्या घरातील अनेक जणांचे थेऊरला येणेजाणे होते. पेशवे घराणे हे गणेशभक्त होते. त्यामुळे थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशव्यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. त्यांची समाधी देखील त्या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात माधवराव पेशव्यांचे कलात्मक दालन आहे.

हे सुद्धा वाचा

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

Andheri East By Poll Election : मुंबईत होणार शिवसेना वि. शिंदेसेनेचा सामना ?

VIDEO : राज ठाकरेंनी सांगितला शस्त्रक्रियेचा अनुभव

कसे जाल थेऊरला?
हे ठिकाण पुणे जिल्हयातील, हवेली तालुक्यात आहे. पुणे- सोलापूर महामार्गला जोडलेल्या रस्त्यावर आहे. पुण्यापासून हे ठिकाण 30 किमी अंतरावर आहे. थेऊर फाटा ते थेऊर हे अंतर 5 किमी आहे. तर मुंबईपासून हे अंतर 191 किमी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी