29 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रएसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार

एसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार

टीम लय भारी

इंदौर : इंदौरहून जळगाव येथील अंमळनेर येथे निघालेली एसटी बस नर्मदा नदीत कोसळून काल भीषण अपघात झाला, यामध्ये 12 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अचानक ओढवलेल्या या आपत्तीने अवघा महाराष्ट्र हळहळला. दरम्यान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 12 जणांवर आज मध्य प्रदेशातील धार येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

एसटी अपघातात मृत्यू झालेल्या 12 जणांपैकी अद्याप 7 जणांची ओळख पटली आहे. यातील चार जण जळगावचे, एक मुर्तीजापूर आणि दोन राजस्थान येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

बसमध्ये साधारण 50 ते 55 प्रवासी होते, त्यापैकी केवळ 15 जणांनाच वाचवण्यात यश आले, बारा जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यामुळे नर्मदा नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

अमळनेर खलघाट ठिगरी येथे काल सकाळी पावणे दहाच्या सुमारास एसटीला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. यामध्ये वाहकाचे बसवरील नियंत्रण सूटल्याने बस पुलावरून थेट नर्मदा नदीत कोसळली. संजय सेतू पुलावर ही घटना घडली.

इंदौरपासून सुमारे 80 किमी अंतरावर हा अपघात घडला. दरम्यान, खलघाटमध्ये बस इतर वाहनांना ओव्हरटेक करीत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटले असावे असा अंदाज बांधला जात आहे.

या बसमध्ये सात कुटुंब होती, तर यामध्ये 13 लहान मुले होती. आतापर्यंत केवळ 15 जणांना वाचवण्यात यश आले असून अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत त्यामुळे शोधकार्य जोरात सुरू आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : सामान्यांना संकटात टाकण्याचा नवा डावपेच

शिवसेना हा ‘नोंदणीकृत’ राजकीय पक्ष; शिवसेना ‘गट’ नाही- संजय राऊत

बॉम्बचा वापर करुन एटीएममध्ये चोरीचा डाव पोलिसांनी उधळला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!