30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रEknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले !

तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना संकट ओसरले त्यामुळे आता राज्याची आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना सत्तेत ‘पुन्हा येणार’ असे म्हणून वेध लागलेल्या नेत्यांनी सत्तासंघर्षाची खेळी करण्यात धन्यता मानली आणि राज्याचे अर्थकारण चांगलेच कोलमडून गेले. या आर्थिक घडीबाबत बोलताना राज्याच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत स्पष्टता केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यातील वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन 14 टक्क्यांनी म्हणजेच तब्बल 3200 कोटींनी घटले आहेत, तर पावसाळ्यातील खरेदी – विक्रीचे व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भडकलेले तेलदर याचा सुद्धा उल्लेख करीत आर्थिक गणित बिघडल्याचे म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा करात 18,863 कोटींचे संकलन झाले होते तर जुलैमध्ये हीच आकडेवारी 22,129 कोटींची होती. यामध्ये तीन हजार कोटींपेक्षा अधिक किंवा 14 टक्के संकलन कमी होत असेत तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे आणि या चालू आर्थिक वर्षातील महिन्याचे संकलन लक्षात घेतले तर सर्वात कमी संकलन झाल्याचे लक्षात येईल असे म्हणून वित्त विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ऑगस्टमधील संकलन कमी असले तरीही राज्याची अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे वित्त विभागाच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे.

 हे सुद्धा वाचा…

Arvind Kejriwal : …तर गुजरातमध्ये ‘आप’ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा

अमित शाह मुंबईत येणार; गणेशोत्सवाच्या खांदयावरून पालिकेच्या निवडणुकीची पेरणी करणार

VIDEO : मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळाना अग्नि सुरक्षेचे धडे

त्याचवेळी लक्ष वेधून घेत गेल्या ऑगस्टची तुलना करीत यंदाच्या ऑगस्टमध्ये राष्ट्रीय पातळीवर 19 टक्के संकलनात वाढ झाली; पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या संकलनात 24 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सदर अधिकाऱ्याने सांगितले आहे. पावसाळ्यात आर्थिक व्यवहार, खरेदी – विक्री फारशी होत नाही त्यामुळे परताव्याचे प्रमाण यावेळी कमीच पाहायला मिळते. यावर बोलताना उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यावेळी सांगितले, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी या महिन्यांत तिमाही परतावा सादर केला जात असल्याने संकलन अधिक दिसते. परिणामी जुलैमधील संकलन अधिक होते त्यामुळे सप्टेंबरमध्ये सणासुदीमुळे राज्याच्या जीएसटी संकलनात वाढ होईल असा विश्वास अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, देशाच्या जीएसटी संकलनात सगळ्या राज्यात कायम महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे पाहायला मिळतो. त्याबाबत वित्त विभागाकडून महिनानिहाय आकडेवारी सादर करण्यात आली आहे, त्यावरून लगेचच राज्याच्या आर्थिक गणिताचे समीकरण लक्षात येते. सदर आकडेवारी एप्रिल पासून देण्यात आली आहे. एप्रिल 27, 495 कोटी,  मे 20,313 कोटी, जून 22,341 कोटी, जुलै 2,129 कोटी, ऑगस्ट 18,863 कोटी अशी आकडेवारी सादर करण्यात आली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून राज्य अर्थकारणात मागे पडतोय का याचे उत्तर निश्चितच या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी