28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज

पावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज

टीम लय भारी

ठाणे : आगामी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. या काळात होणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजनांबाबत (State government) आरोग्य विभागामार्फत जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथ नियंत्रण कक्ष व पुरपरिस्थिती नैसर्गिक आपत्ती काळासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. (State government is ready to overcome monsoon diseases)

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक तो औषधांसह सर्पदंशवरील इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत असल्याचे जिल्हा (State government) आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर तीन भरारी पथक स्थापन करण्यात आले असून ती २४ तास कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात तीन तज्ञ डॉक्टरांचे शिघ्र प्रतिसाद पथक कार्यरत असून येथील आरोग्य विभागात साथ नियंत्रण (State government) कक्ष कार्यरत आहे. तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर देखील हा कक्ष कार्यान्वित आहे.

पावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज

प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक त्या औषधसाठ्यासोबत (State government) सर्पदंशवरील इंजेक्शन सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावर जादा औषधसाठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर (State government)  पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या २१ औषधांची यादी पाठविण्यात आली असून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :- 

AUTO REFRESH ON Coronavirus LIVE Updates: Mumbai Records 961 New Infections, Active Cases at 4,880

लेक सावित्रीची शान महाराष्ट्राची या पुरस्काराने जयंत पाटील यांच्या हस्ते शोभा आखाडे मोरे सन्मानित

भाजपने आतातरी गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना वेसण घालावी : रोहित पवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी