33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रDigital Media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे शनिवारी राज्यस्तरीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांच्या...

Digital Media : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे शनिवारी राज्यस्तरीय अधिवेशन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन येत्या शनिवारी पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन येत्या शनिवारी पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. या अधिवेशना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२२’ आणि ‘विशेष राज्यस्तरीय पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनानिमित्त ‘डिजिटल मीडिया – नवे माध्यम’ या विषयावर परिसंवादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी खासदार श्रीनिवास पाटील आणि प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानपरिषद सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

Crime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!

Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

दरम्यान या अधिवेशनामध्ये ‘डिजिटल मिडिया – नवे माध्यम’ या परिसंवादामध्ये वक्ते म्हणून जलतज्ज्ञ अनिल पाटील, अॅड. अतुल पाटील, विशाल गरड, माहिती जनसंपर्क पुणे विभागाचे उपसंचालक पुरूषोत्तम पाटोदकर सहभागी होणार असून संवादक म्हणून माध्यम सल्लागार जयु भाटकर, संजय जेवरीकर हे सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र गौरव पुरस्काराचे मानकरी
डॉ, सुरेश भोसले (कराड), खासदार श्रीकांत शिंदे (ठाणे), अभिनेता मंगेश देसाई, श्रीकांत मोरे (सोलापूर), डॉ. प्रतापसिंह पाटील (उस्मानाबाद), डॉ. संजय उगेमुगे (नागपूर), चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, चेतना सिन्हा (सातारा), अच्युत सावंत भोसले, (सिंधुदुर्ग)

राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी
दिपक भातुसे (पत्रकार), लक्ष्मीताई कऱ्हाडकर (नगराध्यक्षा, पाचगणी), डॉ. लालासाहेब शिंदे (उद्योजक), गणेश राऊत ( युवा उद्योजक), डॉ. बी.एस. भोसले (डायरेक्टरक, आशा होमिओपॅथी), पल्लवी मोरे पाटील (मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद), आर्चना वाघमळे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सातारा), हणमंत काटकर (सामाजिक कार्यकर्ते), कैलास केंद्रे ( मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद), संताजी घोरपडे (सामाजिक कार्यकर्ते), नरसिंग दिसले ( शिक्षण, आरोग्य सेवा), मनिषा मुळीक ( उद्योजक), डॉ. किरण लोहार ( शिक्षणाधिकारी, सोलापूर), सरदार बंगे (कोल्हापूर)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी