30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रPankaja Munde : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मुंडे भगिंनीची भेट

Pankaja Munde : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मुंडे भगिंनीची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मुंडे भगिंनीची भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे भगिनींची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये पक्ष संघटनेवर चर्चा झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते कामाला लागले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे भगिनींची भेट घेतली. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये पक्ष संघटनेवर चर्चा झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून ते कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजप कसे आघाडीवर राहिल यासाठी ते नियोजन करत आहेत. त्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी पंकजा मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची आणि प्रीतम मुंडेची भेट घेतली. दोन वर्षांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकवेळा पक्षाने आपल्याला डावल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता प्रदेशाध्यक्ष बदलले त्यांनी भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पंकजा मुंडे या नाराज असल्याचे बावनकुळे यांनी खंडन केले आहे. त्या नाराज नाहीत आणि या पूर्वी देखील नाराज नव्हत्या. त्या आता भाजपसाठी पुर्णवेळ काम करणार आहेत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडयांना टोलमाफी, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Festival: महाराष्ट्रात बैलांबरोबरच गाढवांचा पोळा देखील साजरा करतात

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

पंकजा मुंडेची विधान परिषदेवर वर्णी लागेल अशा चर्चा होत्या परंतु तसे झाले नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्या आपला पूर्णवेळ पक्षाला देणार आहेत. पक्ष संघटन आणि निवडणुकीवर भर देणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दरम्यान या काळात पक्षाचे संघटन आणि आगामी काळात होणाऱ्या निवडणुका हेच त्यांचे धेय्य राहणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका आणि पक्ष संघटनेवर चर्चा झाल्याचे झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी