38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रचक्रीवादळापेक्षाही कोरोनाचे वादळ थांबवा; संजय राऊतांचा केंद्राला टोला

चक्रीवादळापेक्षाही कोरोनाचे वादळ थांबवा; संजय राऊतांचा केंद्राला टोला

टीम लय भारी

मुंबई :- अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. संजय राऊत म्हणाले, वादळ (Storm) येत आणि जात असते. परंतु या चक्रीवादळापेक्षाही देशात निर्माण झालेले कोरोना वादळ (Storm) मोठे आहे. चक्रीवादळापेक्षाही कोरोनाचे वादळ थांबवा; संजय राऊत यांनी केद्र सरकारला टोला हाणला (Stop the storm of the corona more than the hurricane; Sanjay Raut slammed the central government).

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले. चक्रीवादळ पेक्षाही या देशात जे कोरोनाचे वादळ (Storm) निर्माण झाले आहे ते थांबवणे गरजेचे आहे. या कोरोनाच्या वादळाने (Storm) रोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. ते आधी थांबवले पाहिजे. बाकीचे वादळ (Storm) येतात आणि जातात. पण कोरोना वादळाचे (Storm) काय करणार?, असा सवालही त्यांनी केला. यावेळी लसीकरणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. लसीकरणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहेत. लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत रोहित पवारांनी केंद्र-राज्य सरकारला केले आवाहन!

“कुठून हे नग मिळतात?, जितेंद्र आव्हाड थेट माजी मुख्यमंत्रांवर भडकले…

Tauktae likely to turn into ‘very severe cyclonic storm’, says IMD; red alert in 5 Kerala districts

फोन टॅपिंग ब्लॅकमेलिंगचे हत्यार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे फोन टॅप होत आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केले. देशांमध्ये कोणाचे फोन टायपिंग होत नाही हे सांगा. आमचे देखील झाले आहेत आणि आता देखील होत असतील. हा आता राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टायपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचा एक हत्यार आहे. मी नाना पटोले यांना देखील सांगेन घाबरू नका. फोन टायपिंग ही काही मोठी गोष्ट नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी