इयत्ता दहावीचा रिझल्ट नुकताच लागला. यात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc school) शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (bmc school) 248 माध्यमिक शाळांमधून एकूण 16 हजार 140 विद्यार्थी या परीक्षेला होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे. इयत्ता दहावीचा रिझल्ट नुकताच लागला.(Student studying in bmc school gets 97.40 per cent, prepares for exam)
यात यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून एकूण 16 हजार 140 विद्यार्थी या परीक्षेला होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल 91.56 टक्के इतका लागला आहे. कुलाबा माध्यमिक शाळेत शिकणारा आयुष रामदास जाधव हा 97.40 टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम आला. महानगरपालिकेच्या 79 शाळांचा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे. यासह 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले 63 विद्यार्थी आहेत. कुलाबा महानगरपालिका माध्यमिक शाळेतील आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने 97.40 टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी तर द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा कुमार वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून, त्याला 97.20 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा कुमार आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला 96 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
मिशन मेरिट पुस्तिकांची निर्मिती
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयावर आधारित ‘मिशन मेरिट पुस्तिकां’ची निर्मिती करुन त्याचे वितरण केले.
असा केला प्रश्नपत्रिकांचा सराव
या पुस्तिका आणि त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा यासाठी डिसेंबर 2022 पासून (विद्यार्थी नववीत असतानाच) दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर पाच सराव प्रश्नपत्रिका पाहून व पाच सराव प्रश्नपत्रिका न पाहता अशा एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.
महापालिका शाळांचा चढता आलेख
महानगरपालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च 2020 मध्ये 93.25 टक्के, मार्च – 2021 मध्ये 100 टक्के, मार्च -2022 मध्ये 97.10 टक्के, मार्च 2023 मध्ये 84.77 टक्के व या वर्षी मार्च 2024मध्ये 91.56टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी 42शाळांचा 100 टक्के निकाल लागला.
विद्यार्थी संख्येत वाढ
या वर्षी मार्च 2024 मध्ये 79 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे. गेल्यावर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 53 होती. यंदा त्यात दहा विद्यार्थ्यांची वाढ होवून ही संख्या 63 झाली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्याथ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया मुख्याध्यापक, शिक्षकांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन
सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन देण्यात आले होते. तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देवून मार्गदर्शनही करण्यात आले. मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या.
तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक
शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची
कमतरता होती त्याठिकाणी तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. पर्यवेक्षणीय
अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती देण्यात
आली.