34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रशिक्षकांची अंधश्रद्धा; विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखले

शिक्षकांची अंधश्रद्धा; विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखले

टीम लय भारी

नाशिक : भारतात महाराष्ट्राची एक प्रगत राज्य म्हणून ओळख आहे. पण या प्रगत राज्यात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा (superstitions) कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये अंधश्रद्धेबाबतची एक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका शिक्षकाने या अंधश्रद्धेला खतपाणी घातल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कायमच अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेकडून जनजागृती करण्याचे काम करण्यात येते. पण तरीसुद्धा काही व्यक्ती अशा आहेत, ज्या अंधश्रद्धांना खतपाणी घालताना दिसून येतात.

नाशिक जिल्ह्यामध्ये आजही काही गावे अशी आहेत, जिथे लोकांमध्ये अंधश्रद्धा असल्याचे पाहायला मिळते. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे अंधश्रद्धेसंबंधित अशीच एक घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वरमधील देवगाव येथे मुलींची शासकीय कन्या आश्रम शाळा आहे. या शाळेत काही दिवसांपूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. शाळेच्या आवारात या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पण याचवेळी शाळेतील एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखण्यात आले (superstitions of teachers; The student was prevented from planting trees). या विद्यार्थिनीला मासिक माळी आल्याने शिक्षकांनी सर्व विद्यार्थिनींसमोर या विद्यार्थिनीला झाडं लावण्यापासून थांबवले. विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याने आणि या मुलीने मासिक पाळीमध्ये झाडं लावले तर ते झाडं जगणार नाही असे कारण देत शिक्षकाने त्या विद्यार्थिनीला झाडं लावण्यापासून रोखले. दरम्यान, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनेनंतर संबंधित शिक्षकांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या शिक्षकांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

साहेब पोहायला गेले आणि….

पुण्यात दहशतवादी कृत्यांना वेग? दुसऱ्यांदा बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

‘त्यांचे केवळ राजकारणासाठी हिंदुत्व…!’ शिवसेनाप्रमुख ठाकरेंचा शिंदेगटावर थेट आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी